विदर्भ

‘अ’ दर्जाची पात्रता, ‘ब’ दर्जाची मान्यता, निधी मात्र ‘क’ दर्जाचा

सकाळ वृत्तसेवा

वाशिम : मालेगाव तालुक्यात मुक्कामी असल्याने सकाळीच शिरपूर जैन या ऐतिहासिक नगरीत प्रवेश केला. ‘सकाळ’चे शिरपूर जैनचे शहर बातमीदार गजानन देशमुख व मालेगाव तालुका बातमीदार अरविंद गाभने यांनी स्वागत केले. त्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतीला भेट दिली. ग्रामविकास विभागाच्या विविध योजना, शहरातील अतिक्रमण, शहर विकास आराखडा, पाणीपुरवठा (Water supply), पर्यटन विकास, कोवीड साथरोग व्यवस्थापन आणि इतर मुद्यांवर चर्चा केली. विकासाबाबत स्थानिकांमध्ये लोकप्रतिनिधींवर प्रचंड रोष (Enormous anger at the people's representatives) दिसून आला. (Huge outrage on people's representatives among locals about development)

बस स्टॅण्डवरील अंतरिक्ष टॉवरची संकल्पना चांगली वाटली. परंतु येथील कोट्यवधींची सरकारी जागा अतिक्रमणाने गिळंकृत केल्याचे दिसले. अतिक्रमणाच्या मुद्द्यावर शहरात सर्वपक्षीय युती-आघाडी दिसल्याने ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ अनुभव आला. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार तरी कोण? असा केविलवाणा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. शहरातील बेशिस्त वाहतूक व्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष जाणवले. प्रवासी वाहतूक करणारी वाहने, मालवाहू वाहने यांना वेगवेगळ्या जागा नेमून देणे आवश्यक असल्याचे काहींनी सांगितले. स्थानिक पवळी मंदिराला भेट दिली. पोलिस स्टेशन परिसरात तब्बल ५९ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांसाठी निवासी घरे नसल्याचे दिसले.

शहराच्या मेन रोडने जात असताना या रोडला मेन रोड का म्हणत असावे, असा प्रश्न पडला. दोन वाहने समोरासमोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होईल, असा शिरपूरचा मेन रोड राजकीय भ्रष्टाचाराचा राजमार्गच वाटला. कारण अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण करून रोड गिळंकृत केल्याचे दिसले. शहरातील राजकीय नेतृत्व या अतिक्रमणाकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत असावे. म्हणूनच काही धनदांडग्यांनी अगदी रस्त्यावर दुकाने थाटल्याचे दिसले.

हिंदू-मुस्लीम एकात्मतेची जोपासना

मिर्झा मियाँ दर्ग्यावर भगवा आणि हिरवा झेंडा एकत्रितपणे बांधलेला दिसला. दर्ग्याच्या मौलवींनी शिरपूरच्या सांप्रदायिक एकात्मतेची माहिती दिली. शहराच्या पूर्वेला संत सावता महाराजांचे मंदिर दिसले. ‘कर्म हीच पूजा’ अशी शिकवण देणाऱ्या सावता महाराजांना वंदन करून श्री जानगीर महाराज संस्थानाकडे निघालो. परंतु या मार्गावर जागोगाजी रस्ते उखडलेले, नालीवरील पुलाला भगदाड पडलेले, नाल्या तुंबलेल्या आणि कचऱ्याचे ढीग दिसले. जानगीर महाराज संस्थानचे प्रवेशद्वार, निकटच्या हनुमान मंदिरातील काच वापरून केलेली सजावट बघून मन प्रसन्न झाले. महाशिवरात्रीच्या महाप्रसादाचा नैवेद्य व चादर सर्वप्रथम मिर्झा मियाँ दर्ग्यावर अर्पण केली जाते. मिर्झा मियाँच्या उर्सच्या संदलचा प्रसाद इथे जानगीर महाराज संस्थानावर सर्वप्रथम चढवला जातो. त्यानंतरच दोन्ही देवस्थानाच्या महाप्रसादाला सुरुवात होते, अशा धार्मिक एकात्मतेच्या परंपरेची माहिती संस्थानचे पुजारी शंकर चोपडे यांनी दिली.

वाशिम जिल्ह्याची राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करणारे शिरपूर जैन जैनांची काशी म्हणून जगविख्यात आहे. मात्र, जनहित याचिकेच्या उच्च न्यायालयाच्या निकालानुसार शिरपूर येथील सर्व अतिक्रमण काढून शिरपूर विकास आराखड्यास जोपर्यंत मंजुरी मिळत नाही, तोपर्यंत येथे पर्यटन निधी खर्च करता येणार नाही, असे आदेश आहेत. शिरपूरच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू.
- अमित झनक, आमदार, रिसोड
पर्यटनस्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केला. शिरपूर विकास आराखडा तयार करण्यासाठी न्यायालयीन लढाई जिंकली. न्यायालयाने शहरातील सर्व अतिक्रमण काढून शाहरविकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. मात्र स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे जैनांची काशी आजही भकास आहे. ना रस्ते, ना सांडपाण्यासाठी नाल्या, ना पिण्याचे पाणी. येणाऱ्या पर्यटकांसाठी येथे कोणतीही व्यवस्था नाही. सर्वांनी स्वतःची पोळी भाजण्याचे काम केले.
- मो. इमदाद मो. अफसर, जनहित याचिकाकर्ते, शिरपूर
विकासकामांसाठी ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळतो. शहराचे वाढते क्षेत्र व लोकसंख्या पाहता हा निधी अपुरा पडतो. शहरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आमदार व खासदारांनी शिरपूरसारख्या पर्यटन क्षेत्रास भरघोस निधी द्यावा. या भागाचे खासदार मंत्रीसुद्धा असल्याने त्यांनी विशेष पॅकेज देणे गरजेचे आहे. पाच वर्षांपासून स्थानिक ग्रामपंचायतीत आमची सत्ता आहे. जनहित याचिकेच्या निकालानुसार ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढून विकास आराखडा नगररचना विभागाकडे पाठविला. मात्र, प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे प्रकरण प्रलंबित आहे.
- अशोक अंभोरे, संस्थापक अध्यक्ष, क्रांती पॅनल शिरपूर व शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष, वाशीम

(Huge outrage on people's representatives among locals about development)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT