lockdown
lockdown esakal
विदर्भ

‘डेल्टा प्लस’मुळे यवतमाळमध्ये वाढविले निर्बंध

सकाळ वृत्तसेवा

तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार दुपारी चार वाजताच ‘शटर डाऊन’ होणार आहे.

यवतमाळ : राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येत्या सोमवारपासून (ता.28) कडक निर्बंध लागू केले आहेत. तिसर्‍या लाटेचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार दुपारी चार वाजताच ‘शटर डाऊन’ होणार आहे. शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवावगळता इतर सर्व व्यवसाय व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शनिवारी (ता.26) निर्गमीत केले आहेत. (in yavatmal, all shops will be closed from four pm on monday due to delta plus)

कोविड-19 या विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजना म्हणून राज्यात लॉकडाउन टप्प्याटप्प्याने पारीत करण्यात येत आहे. जिल्ह्यात डेल्टा पल्सच्या अनुषंगाने सोमवारपासून (ता.28) लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’अंतर्गत शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील बाजारपेठा दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू असणार आहेत. उत्पादनक्षेत्र 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू ठेवण्यात परवानगी देण्यात आली आहे. कोविड त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. पालन न केल्याचे आढळून आल्यास आस्थापनाधारकांना पहिल्यांदा 25 हजार व पुन्हा आढळून आल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

काय राहणार सुरू?

-अत्यावश्यक सेवा दररोज दुपारी चारपर्यंत

-अत्यावश्यक सेवावगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी चारपर्यंत शनिवार व रविवारी बंद

-सार्वजनिक ठिकाणे, मैदाने सकाळी पाच ते नऊपर्यंत

-हॉटेल्स, रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार चारपर्यंत 50 टक्के आसनक्षमता.

-शनिवार व रविवारी पार्सल सेवा, होम डिलिव्हरी

-खासगी आस्थापने सोमवार ते शुक्रवार चारपर्यंत (खासगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्त संस्थावगळता)

-शासकीय व निमशासकीय कार्यालये 50 टक्के उपस्थिती (कोरोनाविषयक कामे करणार्‍या आस्थापनावगळता)

-आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक पूर्ण वेळ

-सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के किंवा 50 व्यक्तींपैकी कमी असेल तेवढ्या.

-धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद.

-विवाह समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत.

-अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थितीत.

-जीम, सलून दररोज सायंकाळी चारपर्यंत (50 टक्के क्षमतेने)

-सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण क्षमतेने.

हे राहणार आहे बंद

-शिकवणी वर्ग

-मॉल्स, चित्रपट, नाट्यगृहे पूर्णपणे बंद

जमावबंदी आणि संचारबंदी

डेल्टा प्लस वेरियंट व कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता संपूर्ण राज्यालाच लेव्हल तीनमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे सात जूनपासून निर्बंधांमधून मोठ्या प्रमाणावर मिळालेली सूट कायम राहू शकली नाही. परिणामी सोमवारपासून (ता.28) जिल्ह्यात सायंकाळी पाचपर्यंत जमावबंदी, तर सायंकाळी पाचनंतर संचारबंदी लागू राहणार आहे.

नागरिकांनी आपल्या व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. कोरोना त्रिसूत्रीचे पालन करावे. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये. सध्या दुकानांच्या वेळा दुपारी चार वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकारच्या नवीन दिशानिर्देशानुसार सोमवारपासून (ता.28) निर्बंध लागू केले जातील.

- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT