Kanyakumari sculptor's birthplace transformation 
विदर्भ

कन्याकुमारी शिल्पकारांच्या जन्मभूमीचा कायापालट; पीयूष गोयल यांनी घेतले होते दत्तक ग्राम टिमटाळा ​

नंदकिशोर इंगळे

पापळ (जि. अमरावती) : चार वर्षांपूर्वी खासदार दत्तक ग्राम योजनेद्वारे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दत्तक घेतलेल्या नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍याअंतर्गत येणाऱ्या टिमटाळा या इतिहासकालीन लोप पावलेल्या गावाचा शंभर वर्षांनंतर कायापालट होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे.

कन्याकुमारी येथील जगप्रसिद्ध विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार एकनाथजी रानडे यांचा जन्म टिमटाळा या छोट्याशा गावी झाला. टिमटाळाचे स्टेशन मास्टर रामकृष्ण रानडे व रमाबाई रानडे यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. उच्च शिक्षणानंतर राष्ट्रसेवेचा ध्यास बाळगून एकनाथजी रानडे हे तरुणपणीच रा. स्व. संघाचे प्रचारक निघाले. राष्ट्रसेवेच्या प्रेरणेतूनच त्यांनी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शीला स्मारकाच्या निर्मितीत सिंहाचा वाटा उचलून आपल्या जन्मभूमीचे नाव जगप्रसिद्ध केले.

गेले कित्येक दशकांपासून टिमटाळा हे गाव उपेक्षितच होते. गावात मुलभत सुविधांबाबत गावाची अत्यंत दयनीय अवस्था होती. गावातीलच युवा सूरज सहारे हा गावातील काही वरिष्ठ मंडळींच्या सोबतीने गावाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करीत होता.

२०१६ मध्ये केंद्रातील भाजप सरकारने खासदार दत्तक ग्राम योजना सुरू केली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांनी विनंतीवरून केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हे गाव दत्तक घेतले. त्यानंतर महिन्याभरात गावातील विकासकामे तातडीने करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले.

त्यानुसार टिमटाळा येथील ग्राम सचिवालय पूर्ण झाले. लाखो रुपये किमतीचे युटिलिटी सेंटर उभारले गेले, जेणेकरून बॅंक, आरोग्य, महसूल संदर्भातील कामे एकाच जागी होऊन ग्रामस्थांना सोयीचे ठरेल. विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिकेचा प्रस्ताव आहे. सोबतच विविध कार्यक्रमांसाठी सभागृह सुद्धा बांधण्यात आले आहे.

गावातील अंतर्गत रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे करण्यात येत आहेत. लघुसिंचन प्रकल्पाचे कामही अल्पावधीतच पूर्णत्वास येणार आहे. विवेकानंद शीला स्मारकाचे शिल्पकार एकनाथ रानडे यांच्या जन्मगावाचा कायापालट होतानाचे चित्र पाहावयास मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम पूर्णत्वास
गावातील दलित वस्तीअंतर्गत येणाऱ्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. युटिलिटी सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. लघुसिंचन प्रकल्पाचे काम झपाट्याने होत आहे.
- माया अजय कोटांगळे,
उपसरपंच, टिमटाळा.

गावामध्ये कारखाना सुरू करा
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी प्रशासनाने गावामध्ये कारखाना सुरू करावा. जेणे करून प्रत्येक हाताला काम मिळेल व गावकरी आत्मनिर्भर होऊन ग्रामविकास खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल.
- श्रीपाल सहारे,
सामाजिक कार्यकर्ता, टिमटाळा

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT