कोरोना लस  File photo
विदर्भ

घरीच राहू पण लस घेणार नाही, अख्खं गाव ठरलं अफवेचं बळी

सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासन नागरिकांत जनजागृती करीत आहे. मात्र, लसीकरण केल्यानंतर जीवितास धोका निर्माण होतो, असा गैरसमज लोकांत निर्माण झाला आहे. या गैरसमजुतीमुळे खुटाळावासींनी लसीकरण स्पष्ट नकार दिला आहे. आम्ही घरीच राहू पण लस घेणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतल्याने प्रशासनासमोर आता पेच निर्माण झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर ठरवून दिलेल्या वयोमर्यादेत नागरिकांचे लसीकरण होणे आवश्‍यक आहे. लसीकरणासाठी ग्रामस्तरापासून तर राज्यस्तरापर्यंत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे लस घेण्याबाबत उलटसुलट अफवा पसरविण्यात येत आहे. यामुळे काही ठिकाणी नागरिक लस घेण्यास पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चिमूर तालुक्‍याच्या ठिकाणापासून सोळा किलोमीटर अंतरावरील खुटाळा हे गाव आहे. लसीकरणाचे केंद्र असलेल्या नेरीपासून सहा किलोमीटर अंतर आहे. सुमारे सतराशे लोकसंख्या असलेल्या गावातील अंगणवाडीसेविका, आशा वर्करवगळता आतापर्यंत येथील तिघांनी कोरोना लस घेतल्याचे समजते. येथे दोघेजणांची प्रकृती बिघडल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली. त्यात दोघेही पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे.

लस घेतली तर जीवितास धोका निर्माण होतो, असा गैरसमज नागरिकांत पसरल्यामुळे येथील नागरिकांनी लसीकरणाला नकार दिला आहे. ग्रामस्तरावरील कार्यरत यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी नागरिकांना लसीचे फायदे पटवून देत आहेत. मात्र, नागरिक कोणतीही कारवाई झाली तरी चालेल पण लस घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. सध्या 45 वर्षवयोगटाच्यावरील नागरिकांना लस घेण्याची सुविधा आहे. एक मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरणाची सुविधा निर्माण होत आहे. सध्या विविध माध्यमाद्वारे लसीकरणाबाबत मेसेजेस, पोस्ट केल्या जात आहे. त्यामध्ये काही चांगले तर काही दुष्परिणाम होणाऱ्या मेसेजचा समावेश आहे. शिवाय ग्रामस्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या चर्चाही कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे चिमूर तालुक्‍यातील खुटाळा या गावातील नागरिकांत लस घेण्याबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. गावकऱ्यांचा हा संभ्रम दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, तरीही नागरिक नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही घरीच राहू. पण लस घेणार नाही. आमचे राशन, पाणी बंद केले तरी चालेल अशाही प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत.

गावकऱ्यांत कोरोना लशीबाबत संभ्रम निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता स्वतः समोर येऊन कोरोना लस घ्यावी. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल.
-मंजूषा ढोरे, सचिव ग्रामपंचायत खुटाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT