laptop ruber stamp seized from bank manager who made fake documents in yavatmal 
विदर्भ

धक्कादायक! बँक व्यवस्थापकच बनवत होता बनावट कागदपत्रे, तब्बल १९ लाखांना गंडा

सूरज पाटील

यवतमाळ : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 19 लाखांनी गंडा घातल्याप्रकरणी रवींद्र उर्फ रघू गावंडे (वय 64, रा. देऊरवाडी, ता. आर्णी) याला येथील अवधूतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यानंतर आता बोगस नोकर भरतीसाठी बनावट कागदपत्रे बनवून देणारा आर्णी येथील एका बँकेचा व्यवस्थापकच निघाला आहे.  

जयदीप राठोड (रा. आर्णी), असे बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या बँक व्यवस्थापकाचे नाव असून, त्याला आर्णी येथून अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली. आशीष बिडवाईक (वय 36, रा. अमरावती, ह.मु. यवतमाळ) या तरुणाच्या पत्नीला आरोग्यसेविका म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्‍वासन रघू गावंडे याने दिले होते. नातेवाइकांच्या मार्फत आशिषची ओळख गावंडे याच्यासोबत झाली होती. यवतमाळ येथील बसस्थानकावर रोख दीड लाख रुपये दिले व उर्वरित रक्कम नियुक्ती आदेशानंतर देण्याचे ठरले होते. दोन डिसेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेशही दिला. त्यानुसार 28 डिसेंबर रोजी नोकरीवर रुजू होण्याचे कळविले. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आचारसंहिता असल्याचे कारण देत स्थगिती आल्याचे सांगितले.

आपला मुलगा मंत्रालयात फिल्डिंग लावून असल्याची थाप मारली. दरम्यानच्या कालावधीत गावंडे याने फोनवर प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधताच बिंग फुटले. रघू गावंडे, त्याचा मुलगा सूरज यांनी ललिता उभाड, रेणुका शेळके, मयूर डवरे, सुधा वाघमारे व तक्रारदार आशीष बडवाईक यांची 19 लाखांनी फसवणूक केली. फसवणूक झालेल्या व्यक्तींनीच रघू गावंडे याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने सदर बनावट कागदपत्रे कुठून बनविली, याचा तपास केला असता, जयदीप राठोड जाळ्यात अडकला. त्याच्याकडून नऊ रबर स्टॅम्प, एक लॅपटॉप जप्त करण्यात आला. त्यामुळे बोगस भरतीची जंत्री बाहेर येण्याची शक्‍यता पोलिस सूत्रांनी वर्तविली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडावार करीत आहेत.

एसडीपीओंकडून आढावा -
रघू गावंडे हा संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या क्रमांकाचे सात सीम कार्ड वापरत होता. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या नऊ बनावट नोटा, दिव्यांग व्यक्तीचे ओळखपत्र, समाजकल्याण विभागाचे अर्ज यासह विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्घ तक्रारींचा ओघ वाढण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमिवर उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांनी शुक्रवारी (ता.29) दुपारी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठून आढावा घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT