last day to take back nomination form in amravati teacher constituency election 
विदर्भ

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक : रिंगणात नेमेक किती उमेदवार?

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे याच दिवशी रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजपासून या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 28 जणांनी अर्ज दाखल केले होते. 13 नोव्हेंबरला या अर्जांची छाननी झाली. त्यात सर्वच 28 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यामुळे आता अर्ज मागे कोण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक डिसेंबरला मतदान असल्याने उमेदवारांच्या हातात आता केवळ 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. मतदारसंघाचा व्याप प्रचंड मोठा असल्याने एवढ्या कमी दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचणे नव्या उमेदवारांना अतिशय कठीण आहे. त्यामुळे संघटनांनी आपल्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या मदतीने चांगलाच जोर लावला आहे. 

आकडेमोड झाली सुरू -
कोणत्या भागातून कोणते मतदार मिळू शकतात, याची चाचपणी उमेदवारांनी सुरू केली असून त्यावर आकडेमोड सुरू केली आहे. ज्याठिकाणी पहिल्या पसंतीची मते मिळणे कठीण वाटत आहे तेथे दुसऱ्या पसंतीची मते मिळावीत, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. 

शिक्षकांमध्ये चर्चेला उधाण -
शिक्षकांच्या या मतदारसंघात कोणता उमेदवार समोर आहे व कोण मागे पडला, याची चर्चा आता चांगलीच रंगत आहे. खासगीत हे शिक्षक निवडणुकीचे काय चित्र राहील याचा अंदाजसुद्धा स्पष्टपणे सांगत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यातूनच या निवडणुकीचे आश्‍चर्यकारक निकाल येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax law : १ एप्रिल २०२६ पासून मोदी सरकार तुमच्या फोनमधील मेसेज चेक करणार? नव्या Income Tax कायद्यामागचं सत्य काय?

Latest Marathi News Live Update : वाहन चालकाला डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गावर अपघात, महिला जखमी

Leopard: शिकार केलेल्या ठिकाणी बिबट्या पुन्हा-पुन्हा का येतो? माणसाने कोणती काळजी घेतली पाहिजे?

Shashikant Shinde : पक्षाचे हित महत्त्वाचे; सन्मानजनक प्रस्तावासह दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर निर्णय होईल- शशिकांत शिंदे!

Pune Police Rescue : बाणेरमधील लॉजवर पोलिसांची धडक; महिलांची सुटका; व्यवस्थापकासह चार आरोपी अटकेत!

SCROLL FOR NEXT