family day.jpg 
विदर्भ

जागतिक कुटुंब दिन : लॉकडाऊनमुळे वाढला कौटुंबिक जिव्हाळा; कुटुंबालाही दिल्या जातोय वेळ

दत्ता महल्ले

वाशीम : कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे सर्वजन कुटुंबासमवेत राहत आहेत. या काळात कौटुंबिक जिव्हाळा वाढीस लागत आहे. तर कामाच्या शोधात महानगरांत गेलेले नागरिकही घर जवळ करीत असल्यामुळे त्यांना कुटुंबाचीच ओढ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनामुळे संकट आहे. तर दुसरीकडे कौटुंबिक जिव्हाळा देखील वाढीस लागत असल्याचे दिसून येत आहे.

जगभर 15 मे हा दिवस ‘जागतिक कुटुंब दिन’ (युनेस्को) म्हणून साजरा केला जातो. बदलत्या जीवनशैलीनुसार अनेक जण विभक्त कुटुंब पद्धतीला स्वीकारतात. मात्र, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे एक वेगळाच जिव्हाळा निर्माण होतो. घरातील लहान बालकांना आजी-आजोबांचे प्रेम, आपुलकी मिळते. घरातील कर्ता पुरुष, महिला दिवसभर कामावर असल्यास घरामध्ये ज्येष्ठ व्यक्ती असल्यास त्यांना कुठल्याही बाबीचे काळजी नसते. मात्र, बदलत्या जीवनशैलीने एकत्रीत कुटुंब पद्धती दिवसेंदिवस विभक्त होत गेली.

तर दुसरीकडे सध्या संपूर्ण जगच कोरोना या महामारीशी दोन हात करीत आहे. भारतासह राज्यभरातील कामगार, मजूर आपल्या गावाकडे परत येत आहेत. त्यांच्या पावलांना घराची ओढ लागली आहे. एकीकडे रोजगार हिरावल्याचे दुःख उराशी आहे. तर दुसरीकडे आपले गाव, आपले घरच जवळ होत असल्याचे समाधान देखील या नागरिकांच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे. भलेही गावात परतल्यानंतर 14 दिवस त्यांना विलगीकरणात राहावे लागत आहे. 

मात्र, गावच्या मातीत पाय टेकल्यानंतर त्यांना एक वेगळेपणाची आपुलकी लाभत आहे. त्यामुळे अनेकांना गावच्या मातीतील बालपणीचे प्रसंग आठवत आहेत. ही बाब पाहता मजुरीच्या शोधात स्थलांतर झाले. मात्र, अशा स्थिततही मजुरांना, गोरगरिब घटकांना आपल्या कुटुंबाची ओढ लळा लावत असल्याचे दिसून येत आहे.

बच्चे कंपनी ज्येष्ठांसोबत घातला जातोय दिवस
अनेकजण मोल-मजुरी, नोकरी, व्यापार, उद्योगाच्यानिमित्ताने सकाळी लवकरच घराबाहेर पडायची. तेव्हा घरातील चिले-पिले साखरझोपेत असायची. तर सायंकाळी हीच चिले-पिले झोपल्यानंतर घरी परतावे लागत आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे प्रत्येकालाच आपल्या कुटुंबाला वेळ देता येणे शक्य होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या जागतिक कुटुंब दिनी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबातील बच्चे कंपनीसह ज्येष्ठांसोबतच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे कायद्यानुसार नाही! नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी राहुल आणि सोनिया गांधींना दिलासा, EDच्या आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार

Fake Officer: ४ मैत्रिणी, ३ गरोदर, एक तर २० वर्षांची... पण तो IAS नव्हताच! अटकेनंतर धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 91 रुपयांवर

BHC Recruitment 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत मुंबई, नागपूर व संभाजीनगर खंडपीठात २,३३१ पदांची भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai News: खड्डेमुक्त रस्ते पुरवणे महापालिकांची जबाबदारी, उच्च न्यायालयाचे खडे बोल

SCROLL FOR NEXT