memorial of martyred soldiers erected after 18 years in teosa of amravati 
विदर्भ

सकाळ इम्पॅक्ट : १८ वर्षानंतर उभारले शहीद जवानाचे स्मारक, आई-वडिलांच्या हस्ते केले उद्घाटन

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती ) :  शहरातील एकमेव शहीद सचिन श्रीखंडकर यांचे स्मारक गेल्या अठरा वर्षांपासून प्रलंबित होता. आता तिवसा मतदार संघाच्या आमदार व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या दहा लाख निधीतून पोलीस ठाण्याच्या आवारात भव्य स्मारक बांधण्यात आले. शुक्रवारी  स्मारकाचे उद्घाटन शहीद सचिन श्रीखंडकर यांचे वडील सुदाम श्रीखंडकर व आई चंद्रकला यांच्या हस्ते करण्यात आले. 

तिवसा शहरातील विद्युत कॉलनी येथील सुदामराव श्रीखंडकर यांचे लहान सुपुत्र सचिन श्रीखंडकर हा 12वीचे शिक्षण घेऊन 1999साली सैन्यात भरती झाला होता. तेव्हा सचिनचे वय 18 वर्ष होते. अवघ्या सैन्यात तीन वर्ष होत नाही तर 19 जुलै 2002 ला सचिनला वीरमरण आले. सचिनच्या जाण्याने श्रीखंडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आज सचिनला जाऊन 18 वर्षे पूर्ण होत असताना इतक्या वर्षानंतरही तिवसा शहरात शहीद स्मारक नसल्याने शहीद प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात होती. लोकप्रतिनिधी व शहरातील प्रतिष्ठित लोकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे वृत्त 'सकाळ'मध्ये सचिन श्रीखंडकर यांच्या स्मृतिदिनी प्रकाशित करण्यात आले होते. तेव्हा या बातमीची दखल घेत तिवसा मतदार संघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी स्मारकासाठी जागा नियोजित करून दहा लाख निधी मंजूर केला. अवघ्या महिन्याभरात सचिन श्रीखंडकर यांचे स्मारक तिवसा पोलीस ठाण्याच्या खुल्या जागेत बांधण्यात आले. याच स्मारकाचे उद्घाटन शुक्रवारी सचिन यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुदाम श्रीखंडकर, चंद्रकला श्रीखंडकर, मुकुंद श्रीखंडकर, कपिल श्रीखंडकर, ममता श्रीखंडकर, तेजस्विनी श्रीखंडकर,तिवसा नगरपंचायत च्या मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे, तहसीलदार वैभव फरतारे, पोलीस निरीक्षक रिता उईके उपस्थित होत्या. 

सचिनचे मुळगाव हे तिवसा तालुक्यातील वरखेड असून याच गावी सचिनचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर पुढील शिक्षण शहरात झाले व तिथूनच सैन्यात भरती होण्याचा निश्चय सचिनने केला होता. सैन्यात भरती होताच तीन वर्षांच्या सेवेतच 19जुलै  2002ला सचिनला वीरमरण आले. त्रिपुरा आसाम येथे दहशतवाद्यांनी अचानक सचिनसह त्यांच्या तुकडीवर हल्ला केला होता. यामध्ये सचिन लढताना शहीद मरण आले होते. देशाच्या स्वरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे सैनिक आजच्या तरुण पिढीसाठी सैन्यात भरती होऊन देश सेवा करण्यासाठी आजही प्रयत्नशील आहेत. शहीद  स्मारक हे तरुण युवकांसाठी ऊर्जा स्थान आहे. त्यामुळेच तिवसा शहरात देखील स्मारकाची मागणी गेल्या अठरा वर्षांपासून शहीद प्रेमींकडून करण्यात आली होती. याच मागणीला दुजोरा देत सकाळनी स्मारकाचा विषय लावून धरताच आज अठरा वर्षानंतर सचिनच्या स्मरणार्थ स्मारक बांधून शहीद प्रेमींची मागणी पूर्ण करण्यात आली.

सचिनच्या स्मारकासाठी गेल्या 18 वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, आज दिनांक 12डिसेंबर रोजी शहराच्या मध्यभागी शहीद स्मारक झाले व या स्मारकाचे उदघाटन माझ्या व पत्नीच्या हस्ते झाले. त्यामुळे आनंद होत आहे, या स्मारकातून नवीन युवक प्रेरणा घेऊन सैन्यात दाखल होतील व देशाची सेवा करतील. 
- सुदामराव श्रीखंडकर, सचिनचे वडिल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा हट्ट अन् भिकेला लागले खेळाडू... BCCI शी पंगा घेणं पडलं महागात, याला म्हणतात 'तोंड दाबून बुक्क्याचा मार'...

Mohit Kamboj : १०३ कोटी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण बंद ;मोहित कंबोज यांना पीएमएलए कोर्टाचा मोठा दिलासा

Latest Marathi News Live Update : कोकण रेल्वे मार्गावरील दिवा–सावंतवाडी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

'ठरलं तर मग'ने गड राखला पण 'या' मालिकेने हिसकावलं 'कमळी'चं स्थान; दुसऱ्या स्थानावर कोण, वाचा टॉप-१० मालिकांची यादी

‘झिम्मा’ ते 'मिसेस देशपांडे'; सिद्धार्थ चांदेकरच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद; खास ठरलं २०२५

SCROLL FOR NEXT