सावनेर : क्रीडाक्षेत्रात भविष्य घडवायचे नाही का, याचा जाब विचारण्यासाठी क्रीडाप्रेमींनी काढलेला मोर्चा. 
नागपूर

क्रीडासंकुलासाठी अतिरिक्‍त जागा नाकारली; निधी गेला परत; क्रीडाप्रेमींचा "एल्गार'

सकाळ वृत्तसेवा

सावनेर (जि.नागपूर) )  :  युवक- युवतींच्या खेळासाठी अनेक वर्षांपासून वापरात असलेली पालिकेची आरक्षित जागा येथील क्रीडासंकुलाला देण्यात यावी, या मागणीला नगरपालिकेने स्पष्ट नकार दिल्याने क्रीडाप्रेमींमध्ये आक्रोश भडकला. आम्ही क्रीडाक्षेत्रात करिअर घडवायचे नाही का, या प्रश्नाचा जाब विचारण्यासाठी येथील क्रीडाप्रेमी, क्रीडा संघटना व सामाजिक संघटनेच्या संयुक्त सहकार्याने नगरपालिकेविरोधात आंदोलन करण्यात आले.

पालिकेविरुद्ध क्रीडाप्रेमींचा आक्रोश
सोमवारी (ता. 24)सकाळी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी स्थानिक गडकरी चौकातून मोर्चा पालिकेवर धडकला. आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी व प्रशासनाविरोधात नारेबाजी, प्रदर्शनाने विरोध दर्शविला. एवढेच नव्हे तर संतापलेल्या खेळाडूंनी पालिकेच्या पुढील मुख्य रहदारीच्या गांधी चौकात चक्क खेळाची "बॉण्ड्री' करून खेळाला सुरुवात केल्यामुळे जवळपास अर्धा ते पाऊण तास वाहतूक व्यवस्था बंद होती. यामुळे मुख्य अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. क्रीडासंकुलाला जागा न देण्याचा सत्ताधाऱ्यांनी घेतलेला निर्णय यावर विस्तृत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा केला. मात्र, उपविभागीय अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले, पालिकेने न्याय दिला नाही तर आंदोलन आक्रमक करण्यात येईल असा इशारा या निवेदनात दिला.

...म्हणून क्रीडाप्रेमींचा संताप
स्थानिक शहरांमध्ये नवयुवक व खेळाडू यांना खेळण्याकरिता तसेच पोलिस भरती आणि स्पर्धा परीक्षा यामध्ये शारीरिक चाचणी ही शासनाकडून अनिवार्य असल्यामुळे त्यांना सराव करण्याकरिता सावनेरपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगल परिसरात जावे लागते. यात मुलीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. उशीर झाला की त्यांना अंधारात परतावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेऊन क्रीडामंत्र्यांनी शहरात खेळांविषयी संपूर्ण सुविधा असाव्यात, याकरिता एक आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल बनविण्याचे ठरविले. अथक प्रयत्नातून शासनाकडून पाच कोटी निधीच्या प्रस्तावासहित निधी मंजूर केल्याचे आंदोलनकर्ते सांगतात. क्रीडासंकुल उभारण्याकरिता 400 मीटर धावपट्टी असणे फार महत्त्वाचे आहे. तालुका क्रीडासंकुलाकडे इतकी जमीन असल्याने नगरपालिकेला खेळण्याकरिता आरक्षित असलेल्या अतिरिक्त जागेचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव मागील वर्षभरापासून मंजुरीसाठी होता. नगरपालिकेतील भाजप सत्ताधारी पक्षाने 20 फेब्रुवारीला झालेल्या अतिरिक्त जागेचा ठराव स्पष्ट नाकारल्याने शासनाकडून आलेला निधी परतीच्या मार्गावर असल्याने शहरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी संतापल्याचे सांगितले जाते.

...तरच ठराव मंजूर करू !
मोर्चामध्ये ड्रीम क्रिकेट क्‍लब सावनेर, तालुका तायक्वांदो असोसिएशन, समीर इलेव्हन,विश्वरत्न क्रिकेट क्‍लब, रायल वॉंरियर्स, कॅंप काबरा क्रिकेट क्‍लब नागपूर निधी क्रिकेट क्‍लब श्री. गजानन स्पर्धा परीक्षा क्‍लासेस सुपर किंग एनसीसी, नाईट रायडर्स फ्रेंड्‌स बॅडमिंटन क्‍लब लोकशक्ती स्पोर्टिंग क्‍लब, कल्चर ग्रुप, माता मंदिर परिसर क्‍लब, अष्टविनायक क्रिकेट क्‍लब, आयकॉन स्केटिंग ऍकेडमी, सराफ शिक्षण संघटना ,स्थानिक समाजसेवक व सुजाण नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते. पालिकेला 60 टक्के गाळे क्रीडासंकुलाने दिले तरच ठराव मंजूर करू अशी भूमिका घेतल्याचे समजते.

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका !
सत्तापक्षाने खेळाडूंचा नक्कीच विचार करावा. क्रीडासंकुलामुळे संपूर्ण खेळाडूंचे भविष्य उजळेल. हा शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पोहोचले आहे. खेळाडूंच्या भावनेशी व भविष्याची खेळू नये.
डॉ. योगेश पाटील
व्यवस्थापक क्रीडासंकुल सावनेर

अडचण दूर करावी !
पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी सामाजिक भावना जोपासून खेळाडूंना खेळात करिअर घडविता यावे, यासाठी जागा हस्तांतरित करण्याचा ठराव देऊन शहरात उत्तम दर्जाचे क्रीडासंकुल होण्यासाठी असलेली अडचण दूर करावी.
मनोज बसवार, सामाजिक कार्यकर्ते व प्रयास ग्रुप संयोजक सावनेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : पुण्याला पावसाने झोडपलं

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT