Boyfriend escapes with minor girlfriend 
नागपूर

‘रिया’चे वय १७ वर्षे ११ महिने २८ दिवस, तर दाखल झाला नसता हा गुन्हा, वाचा सविस्तर

अनिल कांबळे

नागपूर : प्रियकराने दोन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर प्रेयसीला घरासमोरूनच दुचाकीवर बसवून पळवून नेले. प्रेयसीच्या आईने चटकन मुलीच्या प्रियकराविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कपिलनगर पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. विक्की शेंडे (वय २३, रा. निर्मल कॉलनी, कपिलनगर) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाळा कॉलनीत रिया (बदललेले नाव) ही आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहते. रियाने नुकतीच बारावी पास केली आहे. तिच्या घराच्या बाजूला विक्कीची आजी राहते. विक्कीचे आजीच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. त्यामुळे दोघांची ओळख झाली. विक्कीने तिच्याशी मैत्री वाढवली. दोघांचे दोन वर्षांपूर्वी सूत जुळले. दोघांनीही लग्न करण्यचा निर्णय घेतला. परंतु, रियाच्या आईचा लग्नाला विरोध होता.

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतरच लग्नाबाबत विचार करू, अशी भूमिका रियाच्या आईने घेतली होती. मात्र, रिया आणि विक्की यांना सोबत राहायचे होते. त्याने रियाला अनेकदा घरी नेले. कुटुंबीयांशी ओळख करून दिली तसेच लग्न करीत असल्याचेही सांगितले.

विक्कीने पळून जाण्याचा बेत आखला. गुरुवारी दुपारी बारा वाजता तो रियाच्या घरासमोर आला. त्याने रियाला कॉल केला. ती घराबाहेर आली आणि दुचाकीवर बसवून पळून गेला. रियाच्या आईला माहिती मिळाली. तिने थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दोन दिवसांनी होणार १८ वर्षांची

रियाचे सध्याचे वय १७ वर्षे ११ महिने २८ दिवस आहे. म्हणजे दोन दिवसांनी १८ वर्षांची होणार आहे. त्याने दोन दिवसांपूरवीच पळवून नेले. त्यामुळे विक्कीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीही काढला होता पळ

रिया दहावीत होती तर बेरोजगार असलेला विक्कीचे प्रेम रियावर जडले होते. तिची दहावीची परीक्षा होताच दोघांनी घरातून पळ काढला होता. तेव्हा तिच्या आईने जरीपटका पोलिस ठाण्यात विक्कीविरुद्ध तक्रार केली होती. १० दिवस बाहेर मुक्काम केल्यानंतर विक्कीने रियाला घरी आणून सोडले होते, हे विशेष.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

London Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान दुर्घटनेची आता लंडनमध्ये पुनरावृत्ती

ENG vs IND: लॉर्ड्सवर पुन्हा ड्रामा! आकाश दीपनं फिजिओला बोलावलं, स्टोक्सने केएल राहुलसमोर टाळ्या पिटल्या; Video

Wimbledon 2025 Final: यानिक सिनरने वचपा काढला,अल्काराजला हरवत जिंकलं विम्बल्डनचं विजेतेपद

ENG vs IND: भारतासमोर सोप्पं लक्ष्य, पण इंग्लंडनेही कसली कंबर; 3rd Test जिंकण्यासाठी शेवटच्या दिवसाचं कसं समीकरण?

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

SCROLL FOR NEXT