नागपूर

नागपूर ते बुटीबोरी हा रस्ता सहापदरी करणार

सकाळ वृत्तसेवा

बुटीबोरी (जि. नागपूर) : बुटीबोरीचा उड्डाणपूल (Butibori flyover) हा अत्यंत महत्त्वाचा उड्डाणपूल आहे. हे स्थळ अपघातप्रवण होते. इतर उड्डाणपुलांच्या तुलनेत या पुलाचे काम उत्तम झाले आहे. उड्डाणपुलावर ६९.२७ कोटींचा खर्च झाला. १.६९ किमीचा हा सहापदरी उड्डाणपूल (This is a 1.69 km flyover) आहे. येत्या सहा महिन्यांत नागपूर ते बुटीबोरी हा सहापदरी रस्ता बनवू, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, परिवहन मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) म्हणाले. (Butibori-flyover-inaugurated-by-Union-Minister-Nitin-Gadkari)

बुटीबोरी उड्डाणपुलाचा लोकार्पण समारंभ गुरुवारी (ता. १७) पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. पाच वर्षांत नागपूरला ‘ग्रीन नागपूर’ बनवू. ध्वनी प्रदूषण, हवेतील प्रदूषण आणि पाण्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी काम केली जात आहे. तसेच सीएनजीचा पंप बुटीबोरीत लावण्याचाही प्रयत्न आहे. ट्रक आणि बसेस सीएनजीवर चालल्या तर प्रदूषण कमी होईल. बुटीबोरीत चांगली शाळा, महाविद्यालये, लोकांसाठी चांगला बाजार, परवडणारी घरे बनावी. एक आदर्श टाऊनशिप म्हणून या शहराचा विकास व्हावा व राज्यातील सुंदर शहर बनावे म्हणून काम करण्याची गरज आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले.

बुटीबोरी उड्डाणपुलावर ६९.२७ कोटींचा खर्च करण्यात आला असून, डिसेंबर २०१८ मध्ये हे काम सुरू झाले. बुटीबोरी टी जंक्शनला राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची, बुटीबोरी गावाकडून येणारी व एमआयडीसी क्षेत्रातून येणारी जड वाहनांची वर्दळ असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती. ती आता होणार नाही. १.६९ किमीचा हा सहापदरी उड्डाणपूल आहे, असेही ते म्हणाले.

उड्डाणपुलावर ८० किमी प्रतितास वेगाने वाहने वाहतूक करू शकतील. उड्डाणपुलावरील मुख्य रस्त्याची रूंदी २४ मीटर आहे. या उड्डाणपुलामुळे इंधनात बचत आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. उड्डाणपुलाच्या खालील भागात वृक्षारोपण, लँडस्केपिंग करून सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे अनधिकृत पार्किंगला आळा बसणार आहे, असेही ते म्हणाले. नागपूरची मेट्रो बुटीबोरीपर्यंत आणण्यासाठी लवकरच काम सुरू होईल, असेही ते म्हणाले.

अंबाझरी ते पारडी हा प्रवास नावेतून

दोन ते तीन वर्षांत अंबाझरी ते पारडी हा प्रवास आपण नावेतून करणार आहो. पर्यटनाच्या दृष्टीने नागनदीचा विकास करण्यात येत आहे. नागनदी सौंदर्यीकरणासाठी २,२०० कोटी खर्च करण्यात येणार आहे. बुटीबोरीतही व्हेंटिलेटर्ससह सर्व सुविधायुक्त आदर्श हॉस्पिटल तयार करावे, असे नितीन गडकरी म्हणाले.

(Butibori-flyover-inaugurated-by-Union-Minister-Nitin-Gadkari)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT