central government should announce package for mahavitaran 
नागपूर

उर्जामंत्री म्हणतात, महावितरण अडचणीत; कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे होऊ शकतात वांधे...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : लॉकडाऊनमुळे महावितरणसह देशातील सर्व वीज वितरण कंपन्या आर्थिक संकटात सापडल्यामुळे केंद्राने विजेला अत्यावश्‍यक सेवेत समाविष्ट करून राष्ट्रीय आपदा निवारण फंड (एनडीआरएफ) मधून तत्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. केंद्राने महावितरणला विनव्याजी 5 हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. 

महावितरणला गत 2 महिन्यात 7 हजार 200 कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. एप्रिल महिन्यात वीज बिलाची केवळ 40 टक्केच वसुली झाली आहे. मे महिन्यात ती 25 टक्के कमी होणार असल्याचा अंदाज आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 90 हजार कोटी रुपयांचे पॅकेज वीज वितरण कंपन्यांना देण्याची घोषणा केली असून हे पैसे अनुदान स्वरूपात अथवा बिनव्याजी मिळाले तरच महावितरणला वीज खरेदीचे पैसे, कर्मचाऱ्यांचा पगार व इतर आवश्‍यक देणी देणे शक्‍य होणार आहे. केंद्राने वीज वितरण क्षेत्राला कर्जरुपी पैसे न देता आर्थिक आधार देण्याची हीच वेळ असल्याचे डॉ. राऊत म्हणाले.
 
आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत पॅकेजमधील 90 हजार कोटी रुपये वितरण कंपन्यांना नेमके कोणत्या स्वरूपात, किती रक्कम आणि कधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. हे पैसे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन व रूरल ईलेट्रीफिकेशन कॉर्पोरेशनकडून कर्जाच्या स्वरूपात मिळणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र त्यावर व्याज किती असेल?, कर्ज फेडीचे हप्ते किती असतील व अटी कोणत्या असतील हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. याचा उलगडा लवकर झाल्यास त्यादृष्टीने पुढची पाउले उचलता येतील, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले. 

स्थिर आकार रद्द करण्याची मागणी देखील उद्योजकांकडून होत आहे. लॉकडाऊनमुळे देशांतील वीज वितरण कंपन्यांना खूप मोठा तोटा सोसावा लागत असल्याने नुकसानभरपाईच्या स्वरूपात केंद्राने तातडीने मदत करावी, अशी आग्रही मागणी उर्जामंत्री यांनी केली आहे. 

राज्यात वीज दर वाढीची शक्‍यता 

केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या कर्ज स्वरुपातील पॅकेजमुळे ग्राहकांवर बोजा पडणार असून वीजदरवाढ होणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. केंद्र सरकार महाडीस्कॉमला मदत स्वरूपात कर्ज देणार आहे. या कर्जाचा व्याज 6 ते 8 टक्‍क्‍यांपर्यंत असेल. याचा भुर्दंड ग्राहकांवर पडेल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानचा अनैतिकपणा! हल्ला विध्वंसक, 3 क्रिकेटर्सच्या मृत्यूवर राशिद खानने व्यक्त केलं दु:ख; क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेचं स्वागत

Kolhapur Politics : ‘हत्ती’, ऊसदर व्हाया जिल्हा परिषद आरक्षण, ‘गोकुळ’मध्ये नेत्यांची खुमासदार चर्चा; वसुबारस कार्यक्रमावेळी राजकीय टोलेबाजी

Dhanatrayodashi 2025 : धनत्रयोदशीला कोणत्या गोष्टी करणे टाळावे?

Diwali 2025 Lakshmi Puja Guide: लक्ष्मीपूजन करताना 'हे' नियम ठेवा लक्षात, लाभेल सुख-समृद्धी

क्रिकेटमध्ये नवा नियम! आता फलंदाज नाही खेळू शकणार 'हा' शॉट, गोलंदाजांना होणार फायदा...

SCROLL FOR NEXT