fraud
fraud 
नागपूर

लाखभर रुपये भरा आणि मिळवा नोकरी,फसवणारी टोळी सक्रीय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शासकीय महाविद्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा घालणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. या टोळीतील म्होरक्‍या असलेल्या मायलेकांनी बेरोजगारांना 26 लाख 50 हजारांनी लुटले. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
प्रीती प्रकाश भोसले (वय 62, रा. सत्या अपार्टमेंट, मनीषनगर) या महिला ठगबाजाला अटक केली. तिचा मुलगा प्रतीक (वय 32) फरार आहे. प्रीतीची 24 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. अमित दयाराम बावणे (वय 26,रा. काटोल मार्ग) याने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित उच्चशिक्षित असून, बेरोजगार आहे. तो नोकरीच्या शोधात फिरत होता. त्याची काही दिवसांपूर्वी प्रीती भोसलेसोबत ओळख झाली. प्रीती व तिचा मुलगा प्रतीक दोघांनी अमितला जाळ्यात ओढले. त्याला अमरावती येथील कृषी महाविालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. त्याला आणखी काही बेरोजगारांना नोकरीबाबत माहिती देण्यास सांगितले. त्यामुळे अमितने स्वतःसह 10 बेरोजगारांना नोकरीबाबत माहिती दिली. त्यांची भेट प्रीती भोसले आणि तिचा मुलगा प्रतीकशी करून दिली. त्यांनी कृषी विद्यालयात नोकरीचे आमिष दाखविले.

सविस्तर वाचा - शू $$$ शांतता... कॉपी सुरू आहे
 कोणाकडून तीन तर कोणाकडून आठ लाख असे एकूण 26 लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र कृषि महाविद्यालयात गेल्यानंतर कोणतीही रिक्‍त जागा उपलब्ध नसल्याचे युवकांना कळले. त्यानंतर अमित व अन्य युवकांनी प्रीती व तिच्या मुलाला पैसे परत मागितले. दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर अमित याने सोनेगाव पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून प्रीतीला अटक केली. फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो. प्रीतीने आणखी काही बेरोजगारांना फसविल्याचे उघडकीस आले. त्यामुळे फसवणुकीचा आकडा कोटींमध्ये जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बनावट नियुक्‍तीपत्र
प्रीती भोसले आणि प्रतीक यांनी अमरावतीमधील कृषी विद्यापीठाचे बनावट लेटर पॅड छापले. तसेच रबरी स्टॅंप आणि शिक्‍के तयार केले. त्याद्वारे विविध पदांवर थेट नियुक्‍तीपत्रही देण्यात आले. नियुक्तीपत्र घेऊन युवक कृषी विद्यालयात गेले. कृषी महाविद्यालयाच्या प्रशासन विभागाच्या कार्यालयात जाऊन नियुक्‍तीबाबत विचारणा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे त्यांना सांगितल्यानंतर युवकांची भंबेरी उडाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT