Child commits suicide by killing mother Child commits suicide by killing mother
नागपूर

५१ वर्षीय बेरोजगार मुलाने केली ७८ वर्षीय आईची हत्या; स्वतः घेतले वीष

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : इंजिनिअर असलेल्या ५१ वर्षीय बेरोजगार मुलाने ७८ वर्षीय वृद्ध आईवर चाकूने वार करीत हत्या (Murder) केली. यानंतर स्वतः ‘इंडो सल्फान’ हे विषारी औषध घेत आत्महत्या (commits suicide) केली. ही घटना नागपूरच्या धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिंदुस्थान कॉलनीत घडली. लीला विष्णू चोपडे असे खून झालेल्या आईचे तर श्रीनिवास विष्णू चोपडे असे आरोपी मुलाचे नाव आहे. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला आहे. (Child commits suicide by killing mother)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लीला चोपडे या हिंदुस्थान कॉलनीत असलेल्या मोठा बंगल्यात राहत होत्या. त्यांच्यासोबत मुलगा श्रीनिवासही राहत होता. प्राध्यापक पतीचे निधन झाल्यानंतर लीला यांना पेन्शन मिळत होती. लीला यांना मिळत असलेल्या पेन्शनमधून दोघांचा उदरनिर्वाह चालत होता. कारण, श्रीनिवास हा बोरेजगार होता. त्याने १९९४ पर्यंत इंडोरामा कंपनीत काम केले. त्यानंतर नोकरी सोडली होती.

लीला यांच्या मुलीने आई व भावाला फोन केला दोघांचेही फोन बंद दाखवत होते. यामुळे चिंतीत झालेल्या मुलीने सागर इंगळे या नातेवाइकाला फोन करून माहिती घेण्यास सांगितले. सागर घरी गेला असता बंगल्याचे मुख्यद्वार आणि आतील दाराला कुलूप दिसले. याची माहिती मुलीला देत पोलिसांना फोन केला. धंतोली पोलिसांनी घर गाठून कुलूप तोडले.

बेडरुममधून यायला लागली दुर्गंधी

पोलिसांनी घरात प्रवेश करताच बेडरुममधून दुर्गंध यायला सुरुवात झाली. पोलिस बेडरुममध्ये गेले असता लीला खाली पडलेल्या होत्या. तर श्रीनिवासचा मृतदेह पलंगावर होता. पोलिसांनी श्रीनिवासचा मृतदेह उचला असता चाकू (knife) आढळला. तसेच लीला यांच्या पोटावर जखमाही दिसल्या. सोबतच पलंगाखाली विषारी औषधही आढळले.

हत्येचे गुढ कायम

मुलाने आईच्या पोटावर चाकूने वार (Murder) करीत स्वतः विषारी औषध प्राशन (commits suicide) केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. मात्र, हा प्रकार कशासाठी घडला हे समजू शकलेले नाही. आतून सर्व दारे बंद असल्याने या ठिकाणी कुणी तिसरा व्यक्ती आला नसल्याची बाब समोर येते. त्यामुळे श्रीनिवासने कोणत्या कारणासाठी आईची हत्या केली हे गुढ कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT