commissioner mundhe must have government support 
नागपूर

तुकाराम मुंढे राजाश्रयामुळेच शिरजोर

राजेश चरपे

नागपूर : एक सनदी अधिकारी मनमानी करतो. लोकप्रतिनिंधीचा अपमान करतो. सभागृहामध्ये छाती ठोकतो. नियमबाह्य पद स्वीकारतो आणि अधिकार नसताना निधीचे वाटप करतो. एवढे सारे करूनही राज्य सरकारतर्फे साधी ताकीदही दिली जात नसेल, तर याचा अर्थ काय?

राजाश्रयाशिवाय एवढी हिंमत कोणी करूच शकत नाही, असे सांगून भाजपचे नवनियुक्त प्रदेश माध्यम प्रमुख विश्‍वास पाठक यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर निशाणा साधला. 

नियुक्तीनंतर पाठक यांनी शनिवारी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्‍नांना उत्तरे दिली. ते म्हणाले, आपल्या देशात घटना सर्वोच्च आहे. कायद्याचे राज्य आहे. म्हणून मुंढे यांच्याविरोधात महापौर संदीप जोशी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत मुंढे खोटे बोलत असल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या अध्यक्षांनीच आपण मुंढे यांना मुख्याधिकारी म्हणून अधिकार दिला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी घेतलेले सर्व निर्णयसुद्धा बेकायदेशीर ठरतात. याचा सोक्षमोक्ष न्यायालयात लागेलच. 

"सीआयडी'चा संबंध नाही 
मुंढे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली म्हणून महापौर जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आली. या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. दोन्ही विषय वेगळे आहेत. गोळीबार होऊन सात महिने उलटले आहे. या घटनेची चौकशी कोणामार्फत करायची, हा न्यायालयीन चौकशीचा भाग आहे. 

सरकार पडणारच! 
राज्यातील महाआघाडीचे सरकार पाडण्याचा आमच्यातर्फे कुठलेच प्रयत्न केले जात नाही. हे सरकार आपल्याच कर्माने पडणार आहे. मुळात महाआघाडीची निर्मितीच अनैसर्गिक आहे. ती अधिक काळ टिकेल, असे कोणालाच वाटत नाही. संधी मिळेल तेव्हा भाजप सरकार बनवेल. त्यावेळी कोणाला सोबत घ्यायचे, याचा निर्णय राज्याचे हित आणि राजकीय परिस्थितीनुसार घेतला जाईल. 

राऊतांनी अभ्यास करावा 
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत घोषित केलेल्या पॅकेजमधून नऊ हजार कोटींचा वाटा ऊर्जा खात्याला मिळणार आहे. त्यापैकी अडीच हजार कोटींचा वाटा राज्याला प्राप्तसुद्धा झाला आहे. काही करता येत नसेल, तर केंद्राकडे बोट दाखवयाचे आणि निधी मागायचा, ही पद्धतच झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जाहीर वक्तव्य करण्याऐवजी याचा अभ्यास करायला पाहिजे होता, असेही पाठक यांनी सांगितले. 

(संपादन : प्रशांत राॅय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Semi Final: शाब्बासsss जेमिमा रॉड्रिग्ज! टीम इंडिया फायनलमध्ये; हरमनप्रीत कौरसह मिळवला विश्वविक्रमी विजय

farmer Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीबाबत महायुती सरकारचा मोठा निर्णय! खुद्द फडणवीसांनीच केली घोषणा, म्हणाले...

Local Elections Maharashtra Update : राज्यात आठ वर्षांनंतर स्थानिक निवडणुकांसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा वाढली!

IND vs AUS Semi Final: जेमिमा रॉड्रिग्जचे खणखणीत शतक! हरमनप्रीत कौरची हुकली सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाला धडकी भरवणारी भागीदारी

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

SCROLL FOR NEXT