congress agitation at rajbhawan to meet governor koshyari in nagpur 
नागपूर

VIDEO : उपराजधानीत काँग्रेसचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे रद्द करण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घेण्याची मागणी

अतुल मेहेरे

नागपूर : केंद्र सरकारचे कृषी कायदे आणि इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने आज शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढला. राज्याचे महसूल मंत्री आणि माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मोर्चा राजभवानपर्यंत पोहोचला. त्यानंतर राजभवनाला घेराव घालण्यात आला. 

आज निघालेला मोर्चा मुंबई येथे नियोजित होता. पण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी नागपुरात असल्यामुळे आज राजभवनाला घेराव करण्यात आला. शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी रातोरात कार्यकर्त्यांनी मोर्चाची तयारी केली. आजच्या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्यासह मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर, वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह विदर्भातील काँग्रेसचे आमदार, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. काळ्या कृषी कायद्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढल्याने युवक आणि व्यावसायिक तर गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने गृहिणी अडचणीत आल्या आहेत. तरीही केंद्र सरकारला जाग येत नसल्यामुळे आज देशभरात काँग्रेसने राजभवनाला घेराव टाकण्याचे आंदोलन केले आहे. 

नागपुरात राजभवनासमोर एकाच ठिकाणी नव्हे तर काटोल नाका चौक, छावणी मार्गासह चारही बाजूंनी काँग्रेसचे कार्यकर्ते आले आणि घेराव केला. जेथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे, तेथे आज सकाळपासूनच तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजभवनासमोरून होणारी वाहतूक काटोल नाका चौकातून वळवण्यात आली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह महागाईने होरपळलेली जनता, काळ्या कृषी कायद्यामुळे हवालदिल झालेले शेतकरी आणि सिलिंडरच्या भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या. 

राज्यपालांनी करावा कृषी कायद्याचा विरोध -
ज्या कृषी कायद्यामुळे गेल्या ५० दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. त्यापैकी काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तरीही सरकारला पाझर फुटलेला नाही. शेतकरी जगला तर देश जगेल. त्यामुळे या जगाच्या पोशिंद्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी काळा कृषी कायदा रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांना करणार असल्याचे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT