टेकाडी : सील करण्यात आलेला परिसर.  
नागपूर

पाहता पाहता कोरोनाने अखेर ग्रामीणही घेतले ताब्यात, काय सांगते "ही' आकडेवारी...

विजयकुमार राऊत

नागपूर ग्रामीण  :  नाही नाही म्हणता जिल्ह्यात शिरलेला कोरोना संसर्ग नियंत्रणात येण्याचे नाव घेत नाही. जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाशी संघर्ष सुरू असताना प्रशासनही हतबल झाले आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या कामठीत असून आता तालुका त्रिशतकाकडे वाटचाल करतो आहे. त्याखालोखाल हिंगणा तालुक्‍यात कोरोनाने उद्रेक केला आहे. जिल्हयातील रूग्णसंख्येचा आकडा पाचशेच्यावर गेल्याचे सद्यस्थितीवरून लक्षात येते.

कामठीत ओलांडले द्विशतक
कामठी  :  सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कामठी तालुका प्रशासन सज्ज असले तरी मागील एक आठवड्यात कामठी शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढीवर असून आज पुन्हा 13 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजपावेतो कामठी तालुक्‍यात कोरोना संसर्गाचा रुग्णांनी द्विशतक गाठल्याने तालुक्‍यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 204 वर पोहोचली आहे. त्यातील 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरातील दोन रुग्ण दगावले असून 145 ऍक्‍टिव्ह आहेत.

अधिक वाचा : दिवसाढवळया "तो' चक्‍क अधिका-यामागे धावला कोयता घेउन, कारण काय होते...

काटोल तालुक्‍यात चार रुग्ण
काटोल  :  सोमवारी चारने कोरोनाबाधितांचा आकडा वाढला असून यात शहरातील धंतोली येथील 2 तर डोंगरगाव व कोंढाळी प्रत्येकी एकने वाढला. त्यामुळे तालुक्‍यात बाधित 79 वर पोचले. आतापर्यंत काटोल शहर 47, सिरसावाडी 15, रिधोरा 7, कोंढाळी 6, झिलपा 2, पानवाडी व डोंगरगाव प्रत्येकी एक अशी नोंद झाली आहे. आज काटोल व ग्रामीण भागात एकूण 4 बाधित सापडल्याने त्यांचे निवास परिसर सील केल्याचे तहसीलदार अजय चरडे यांनी सांगितले.

अधिक वाचा : नाल्यालाही सांभाळला नाही पुराचा लोंढा, मग त्याने होते नव्हते तेही नेले...

नरखेड शहरात चार पॉझिटिव्ह
मेंढला (नरखेड)  :  चार महिन्यांपासून एकही रुग्ण नसलेल्या नरखेड शहरात आज प्राप्त अहवालानुसार चार रुग्ण बाधित आढळून आले. बाधितांपैकी दोन रुग्ण पती-पत्नी असून ते 15जुलैला वाशीमवरून आले होते. तेव्हापासून त्यांना ताप व खोकल्याचा त्रास होता. ेनरखेड येथील एका खासगी डॉक्‍टरकडे त्यांनी उपचारही केला. डॉक्‍टरच्या सल्ल्याने शुकवारी त्या दाम्पत्याची नरखेड कोविड सेंटरला चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे नरखेड शहरात खळबळ उडाली. हे दोन बाधित रुग्ण नगर परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचाऱ्याकडे किरायाने राहतात.
अधिक वाचा : अध्यक्षांशिवाय होणार सभा

सावनेर शहरात तीन तर ग्रामीणमध्ये दोन रुग्ण
सावनेर  :  नगरपालिका क्षेत्रात महात्मानगर येथील एका पालिका कर्मचाऱ्यांची 14 वीस वर्षे वयोगटातील दोन मुले कोरोनाबाधित आढळून आली. बाजार चौक येथील पुण्यावरून आलेल्या पती-पत्नीची कोरोना चाचणीमध्ये महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावनेर नगरपालिका क्षेत्रात पुन्हा तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे, तर ग्रामीण भागातील कोरोना चाचणीदरम्यान दोघांचा अहवाल पॉझिटिव्हआढळल्याने तालुक्‍यातील बाधित रुग्णांची संख्या 30 च्या पुढे गेली आहे.

ग्रामपंचायत सदस्यांच्या सासूसह पाच बाधित
टेकाडी : प्राथमिक आरोग्य कन्हान केंद्रांतर्गत सोमवारी पाच रुग्णांची भर पडली. रविवारी ग्रामपंचायत महिला सदस्यांचे पती कोरोनाबाधित आढळल्यानंतर सोमवारी खासगी लॅबमधून आलेल्या अहवालात त्यांची 65 वर्षीय आई कोरोनाबाधित असून रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये न्यू टेकाडी कॉलनीतील दोन रुग्णबाधित असल्याचे निष्पन्न झाले. ज्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या कुटुंबातील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सलून दुकानातील एक42 वर्षीय कर्मचारी कोरोना बाधित आढळलेला आहे तर (15जुलै) रोजी घेण्यात आलेल्या तपासणीचा काही लोकांचा अहवाल तालुका प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात कांद्री येथील एकाच कुटूंबातील दोन रुग्णांचा समावेश आहे. एकंदरीत सोमवारी तालुक्‍यात पाच रुग्णांची नोंद झाली.

जिल्हयातील बाधितांचा तालुकानिहाय आकडा

तालुक्‍याचे नाव एकूण रूग्णसंख्या
कामठी 204
हिंगणा 129
काटोल 79
नागपूर ग्रामीण 57
कळमेश्‍वर 18
रामटेक 12
नरखेड 6
मौदा 3
कुही 2
भिवापूर निरंक

 
संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

श्रीमंतीचा दिखावा की कलाकृतीचा संदेश? शुद्ध सोन्यापासून घडवलेल्या 'टॉयलेट'ची जगात चर्चा, ट्रम्प यांना देऊ केले होते Toilet; किती किंमत?

मराठी अभिनेत्रीच्या धाकट्या भावाला एमपीएससी परीक्षेत अभूतपूर्व यश; सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

Gold Silver Prices Drop: उडवा बार, सोने-चांदीचे उतरले भाव! लग्नसराईपूर्वी खरेदीसाठी सराफा बाजारामध्ये वाढली गर्दी

Mappls उठवणार Google Maps चा बाजार? आता रस्त्यासह एका क्लिकवर मिळणार मेट्रोची A टू Z माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Pune Elections : पुणे जिल्हा निवडणूक, ६० हजार हरकतींवर सुनावणी पूर्ण; १४ नगर परिषदांसाठी अंतिम मतदारयादी जाहीर

SCROLL FOR NEXT