Corona virus changed human lifestyle
Corona virus changed human lifestyle 
नागपूर

सर्वसामान्य कोरोनासह जगण्याची कला हळूहळू अवगत करीत आहेत, वाचा हा रिपोर्ट...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः टीव्ही लावा कोरोनाची बातमी, व्हॉट्‌सऍप उघडा कोरोनाबद्दल माहिती, कुणी भेटले तरी कोरोनाच नाव काढल्याशिवाय राहत नाही. घरा-दारात कोरोनाच्याच गप्पा. इतकेच नव्हे, तर कोरोनावरून जोक्‍ससुद्धा आपण ऐकतो, वाचतो. दहाही दिशेला कोरोनाचाच विषय. हे सारं आपण आत्ता तीन महिने अनुभवतो आहोत. या कोरोनामुळेच नागरिकांची जिवनशैली हळूहळू बदलत असल्याचे दिसून येते. 

घरातील भाजी, किराणा या वस्तुंच्या खरेदीपासून ते मुलांच्या शाळा, क्‍लासेस आणि आई वडीलांच्या नोकरीच्या वेळा आणि कामाचे स्वरूप या सर्वात मोठा बदल झाल्याने, जिवनशैलीत मोठा बदल झाल्याचे दिसून येते. बदलेलल्या जिवनशैलीमुळे अनेक सकारात्मक तर, काही नकारात्मकही बदल झाले आहेत.

तालुका, जिल्ह्याच्या सीमा सील केल्याने नोकरदार, व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. अनेक खासगी कंपनीत काम करणाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. नोकरी करणाऱ्यांनी शहरात घरे घेतली काहींनी वाहने घेतली, त्यांचे हप्ते कसे फेडायचे या विचारात काहींचे मानसिक स्वास्थ बिघडले आहे. या सर्वांवर मात करीत, सर्वसामान्य कोरोनासह जगण्याची कला हळुहळु अवगत करीत आहेत. 

स्वदेशी ब्रॅन्ड वापण्यावर भर
चिनला आपली जागा दाखविण्यासाठी स्वदेशी वस्तुंचा वापर वाढावा यासाठी सोशल मिडीयावर दनकून प्रचार प्रसार केला जात आहे. आता कुठलीही वस्तु खरेदी करण्यासाठी सर्वप्रथम ब्रॅन्ड पाहीला जातो आहे. त्यातही स्वदेशी ब्रॅन्डचीच वस्तु द्या असा आग्रह अनेक ग्राहक धरत असल्याचे दिसून विक्रेत्यांनी सांगीतले.

मुलांचे ऑनलाईन क्‍लासेस 
सकाळी लवकर उठून शाळेत जायच.. तिथून आले की, क्‍लासला आणि मग रात्री आई अभ्यास घेणार. याशिवाय ऍबकस, शिष्यवृत्ती, चित्रकला, पोहणे इत्यादी अदर ऍक्‍टीव्हीटीचे क्‍लासेस वेगळे. शाळकरी मुलांचा अशा प्रकारे व्यस्त दिनक्रम राहत होता. इयत्ता पहिली ते नववी चे विद्यार्थी तर, पालकांपेक्षाही व्यस्त राहत होते. परंतु, लॉकडाऊन झाल्यापासून या सर्वांतून सुट्टी मिळाली आहे. आता, ऑनलाईन क्‍लासेसची डोकेदुखी मागे लागली आहे. यात नेटवर्कची समस्या आहेच. परंतु, शाळा, क्‍लास आणि इतर छंद यासाठी इतके व्यस्त नाही राहीले तरी काही बिघडत नाही ही गोष्ट आता हळुहळु पालकांच्या लक्षात यायला लागली आहे. 


दैनंदिन दिनक्रमच बललला 
कोरोना विषाणूची बाधा होऊ नये यासाठी सर्व स्तरातून काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी बाहेरून आणली जाणारी भाजी, दुध, किराणा खरेदी केल्यावरही मनात भिती असते. बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ धुवून वापरण्याचा नियमच मी घरात घालून दिला आहे. त्यामुळे मुलांना काही खायचेही आणले की, सर्वप्रथम धुवून मगच पॅकींग फोडली जाते. 
- रश्‍मी खोरे,
गृहीणी.

मुलांना जवळ घेण्यास भिती वाटते 
लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर आता ऑफीसला जाण्यास सुरूवात केली आहे. परंतु, ऑफीसमध्ये गेल्यावरही कशाला हात लावण्यास भिती वाटते, कोरोनाचा विषाणू कुठून आपल्याला स्पर्श करेल सांगता येत नाही. त्यामुळे घरी आल्यावर स्वतः च्या मुलांनाही जवळ घेण्यास भिती वाटते. 
- शैलजा पाटील,
बॅंक कर्मचारी. 

कुंटुबातील संवाद वाढला 
लॉकडाऊन मुळे घरातील सर्वच सदस्य एकत्रित असल्याने, आमच्यात आता संवाद वाढला आहे. कोरोना विषयाबाबत चर्चा न करता इतर विषयांवरच आम्ही चर्चा करतो. मुले, सुना आणि नातवंडांनाही आता आमच्याही बोलायला आमचे म्हणणे ऐकून घ्यायला वेळ मिळत आहे. 
- कविता मोहोड,
ज्येष्ठ महिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT