creating more job opportunities is important for reducing poverty said nitin gadkari  
नागपूर

गरिबी आणि कुपोषण दूर करण्याबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य..म्हणाले..

राजेश चरपे

नागपूर: कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउन झाला याचा सर्वाधिक परिणाम झाला तो कामगार आणि मजुरांच्या रोजगारावर. कित्येक जणांचा रोजगार गेला तर अनेक जणांना इतर राज्यातील आपली नोकरी सोडून आपल्या घरी परत जावे  लागले. यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. याचबद्दल भाष्य करताना केंद्रीय मंत्री आणि खासदार नितीन गडकरी यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.   

भंडारा गोंदिया जिल्ह्यात व्यवसायाच्या संधी या विषयावर ते जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी खा. सुनील मेंढे व अन्य अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. भंडारा गोंदिया या जिल्ह्यांचा विकास व्हावा अशी भावना व्यक्त करण्यात आली. पण विकास म्हणजे काय याबद्दल सुस्पष्टता असणे आवश्‍यक असल्याचे सांगतांना नितीन गडकरींनी काही महत्वाचे मुद्दे मांडले.  

काय म्हणाले नितीन गडकरी -

लोकांना रोजगार मिळवून देणे गरजेचे 

आपल्या जिल्ह्याची क्षमता लक्षात घेऊन, विविध कौशल्याचा उपयोग करून नवीन उद्योग उभे करून लोकांना रोजगार मिळवून देणे गरजेचे आहे. जोपर्यंत लोकांना रोजगार मिळणार नाही, तोपर्यंत गरिबी आणि भूकमरी संपणार नाही आणि स्वाभिमानाने जगता येणार नाही. अनेक योजना आणून रोजगार निर्माण कसा करता येईल यासाठी भंडारा-गोंदियातील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

लहान उद्योगांचे क्‍लस्टर तयार होणे आवश्यक 

गरिबी, कुपोषण आणि बेरोजगारी ही मोठी समस्या निर्माण झाली आहे. उद्योग क्षेत्र, शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आली आणि रोजगार उपलब्ध झाला तरच विकास होईल. जिल्हाश: स्थिती वेगळी आहे. म्हणूनच जिल्ह्याची क्षमता ओळखून लहान लहान उद्योगांचे क्‍लस्टर तयार झाले पाहिजे. 

बाजाराच्या मागणीनुसार पीक घ्या

या भागातील प्रमुख पीक असलेल्या धानापासून काय निर्माण होऊ शकते, याचा विचार होऊन, तसे उद्योग सुरु झाले पाहिजे. तांदळाचा पुरेसा साठा असल्यामुळे त्याऐवजी आता कोणते पीक घेता येईल? बाजाराची मागणी काय ते पीक आणि त्यापासून तंत्रज्ञान आणि कौशल्याचा वापर करून उद्योगांचे मॉडेल तयार करावे लागतील, असेही ना. गडकरी म्हणाले.  

 
संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT