cultivation area is expected to increase this year due to heavy rain  
नागपूर

काय सांगता! अतिवृष्टी आणि महापूरामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा; रब्बी लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज 

निलेश डोये

नागपूर, : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, हा पूर रब्बी हंगामाला पोषक ठरणारा ठरत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात यंदा रब्बी लागवड क्षेत्रात वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६० टक्के क्षेत्रात रब्बी पिकांची पेरणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. 

दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊस सरासरी गाठत आहे. त्याचा थेट परिणाम गतवर्षीही रब्बी पेरणीवर झाला होता. यंदाही पावसाने जिल्ह्यात जवळपास सरासरी पार केली आहे. सोबतच अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्याचा फायदा रब्बी पिकांना होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. 

जिल्ह्यात रब्बी हंगामामध्ये गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, मका, मिरची, भाजीपाला आदी प्रमुख पिके घेतली जातात. रब्बीचे जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र हे १ लाख ७३ हजार ५४७ हेक्टर इतके आहे. गत वर्षी जिल्ह्यात रब्बीत कृषी विभागाने १.५५ लाख नियोजित क्षेत्र होते. त्यापैकी १ लाख ५८ हजारावर प्रत्यक्ष पेरणी झाली होती. 

यंदा कृषी विभागाने रब्बीसाठी सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा ३ हजार ६५३ हेक्टर अधिकचे म्हणजेच १ लाख ७७ हजार २०० हेक्टरचे एकूण नियोजन केले आहे. यंदा रब्बी हंगामामध्ये गव्हाचे ८५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ८६ हजार हेक्टरवर लागवड क्षेत्र राहणार असून, त्याखालोखाल रब्बी ज्वारी, मका आदींचा समावेश आहे. गव्हाच्या तुलनेत हरभऱ्याचा पेरा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदा जिल्ह्यात पाऊस चांगला झाला. त्यामुळे जमिनीतील ओलावा आहे. प्रकल्पही चांगले भरलेत. यामुळे रब्बीचेही क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
मिलिंद शेंडे, 
जिल्हा अधीक्षक.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy: गुड न्यूज! भारत बनला जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकलं मागे, GDP किती?

Kannad Minor Boys Missing : शाळेत जातो म्हणत घराबाहेर पडले; कन्नडमधील तीन अल्पवयीन मुले रहस्यमयरीत्या बेपत्ता!

Dombivli Elections : कल्याण–डोंबिवली रणधुमाळीत मनसेचा प्रयोग; जैन समाजातील उमेदवार मैदानात!

Palghar News : ७/१२ वर खोट्या नोंदींचा आरोप; मोखाडा तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न!

Latest Marathi News Live Update : पुण्यात आणखी एका गुंडाने भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT