संभाजी भिडे सकाळ डिजिटल टीम
नागपूर

Sambhaji Bhide Controversy : भिडे यांच्यावर कारवाई करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजपशी त्यांचा संबंध नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः भाजपशी त्यांचा संबंध नाही

सकाळ वृत्तसेवा

Nagpur News : महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता असून स्वातंत्र्याच्या इतिहासात महानायक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आहे. संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे सांगितले.

महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्याबद्दलही निषेधार्ह वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी कॉंग्रेसलाही सुनावले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात पत्रकारांसोबत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, स्वातंत्र्याच्या महानायकांबाबत अशा पद्धतीचे वक्तव्य चुकीचे आहे. भिडेच काय, कुणीही महात्मा गांधी यांच्याविरुद्ध बोललेले सहन केले जाणार नाही. कोट्यवधी लोकांत अशा वक्तव्याने संताप निर्माण होतो. त्यामुळे भिडे यांच्यावर राज्य सरकार योग्य ती कारवाई करेल.

संभाजी भिडे व भाजपचा काहीही संबंध नाही, त्यांची संघटना आहे. या घटनेला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने कॉंग्रेस भिडे यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत आहे, त्याच पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी बोलतात, तेव्हा त्याचाही निषेध करायला हवा, असा टोला त्यांनी कॉंग्रेस नेत्यांना हाणला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल मात्र कॉंग्रेसवाले मिंधे होतात, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike : सामान्यांच्या खिशाला कात्री! साखर थेट शंभरीपार जाण्याची शक्यता; दिवाळीचा फराळही होणार महाग? दुष्काळ, एल निनो, इथेनॉलमुळं वाढलं टेन्शन

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

IT Industry: पुण्यातील आयटी क्षेत्रासाठी महत्त्वाची घोषणा! नवीन रोजगार निर्मितीला फायदा

Latest Marathi News Live Update : कन्नड तालुक्यावर भीषण दुष्काळाचे सावट; हातातोंडाशी आलेली खरीपाची पिके डोळ्यांसमोर जळून खाक

SCROLL FOR NEXT