नागपूर

शेतकऱ्यांवर आली सौभाग्यवतीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

जलालखेडा (जि. नागपूर) : मृग नक्षत्र लागताच शेतीचा हंगाम सुरू झाला. शेतकऱ्यांना राष्ट्रीय बँकांकडून (National Bank) पिककर्ज (Delay in getting crop loan) मिळण्यास उशीर होत असल्याने शेतकऱ्यांची (Farmers in trouble) पंचाईत झाली आहे. शेतकऱ्यांची हक्काची जिल्हा बँक डबघाईस आल्याने राष्ट्रीयकृत बँकेशिवाय पर्याय नाही. परंतु, राष्ट्रीयकृत बँकेकडून शेतकऱ्यांना मिळणारी वागणूक जगजाहीर आहे. बँकेकडे पिककर्जासाठी पंधरा दिवसांपूर्वी अर्ज करूनही बँकेने अद्याप ही शेतकऱ्यांना पिककर्ज दिले नाही. यामुळे नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी करता यावी यासाठी सौभाग्याची लेणी आता खासगी सावकार व बँकेमध्ये गहाण ठेवायला सुरुवात केली आहे. (Farmers-are-helpless-due-to-policy-of-banks)

दोन ते तीन दिवसांअगोदर आलेल्या पावसामुळे कामाला वेग आला. काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात सुद्धा केली आहे. पेरणीसाठी लागणाऱ्या पिककर्जासाठी शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेचे उंबरठे झिजवत आहे. बँकेत कागदपत्रे सादर करूनही बऱ्याच दिवसांपर्यंत पिककर्ज उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

किमान मे महिन्याच्या पहिल्या हप्त्यात कर्ज मिळायला सुरुवात होऊन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पिककर्ज वाटप झाले पाहिजे. मात्र, बँकांच्या अडेलतट्टू धोरणामुळे कागदपत्रांची पूर्तता होऊनही पंधरा दिवसांपासून कर्ज वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे शेतीची मशागत व पेरणी कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शेतकरी खासगी सावकाराचे झिजवितात उंबरठे

राष्ट्रीय बँकेकडून पिककर्ज वाटण्यास होत असलेल्या उशिरामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला मोर्चा खाजगी सावकार व बँकांकडे वळविला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या पत्नीचे, आईचे सौभाग्यलेणी गहाण ठेवण्यास सुरुवात केली आहे. कागदपत्रे सादर करूनही बँका पिककर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे शेतकऱ्यावर सावकाराच्या व खाजगी सोसायट्यांमध्ये सोने गहाण ठेवून शेती पेरण्यासाठी कर्ज घेण्याची वेळ आली आहे. खासगी सावकार तीन टक्के प्रतिमहा व्याजदराने तर खासगी संस्थांमध्ये १० ते १५ टक्के प्रतिमहापर्यंत व्याजदराने आकारण्यात येत आहे.

पंधरा दिवसांपासून पिककर्जासाठी बँक ऑफ इंडिया शाखा सावरगाव येथे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, अजूनही बँकेने पिककर्ज मंजूर करून दिले नाही. त्यातच वेळेवर आलेल्या पावसामुळे पेरणी करण्यासाठी पैसे नाही. त्यामुळे आता आईचे दागिने खासगी सावकाराकडे ठेवण्याशिवाय पर्याय नाही.
- राजेश सितारामजी ठोंबरे, शेतकरी, सावरगाव
बँकांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिककर्ज द्यावे, अशा सूचना दिल्या आहे. याबाबत जिल्हाधिकारी व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा बैठकीत सर्वच बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तरी बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास विलंब करीत असेल व याबाबत तक्रार मिळाली तर त्याची चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
- पंकज देशमुख, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक (एलडीएम)

फोन हेता खणखणत

शेतकरी राजेश सीताराम ठोंबरे यांनी केलेल्या आरोपानंतर सावरगाव येथील बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक इक्बाल शेख यांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर बऱ्याच वेळा फोन केला. परंतु, त्यांनी फोन न उचल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

(Farmers-are-helpless-due-to-policy-of-banks)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

SCROLL FOR NEXT