farmers facing problems while getting loan in pachkhedi of nagpur
farmers facing problems while getting loan in pachkhedi of nagpur  
नागपूर

आठ दिवसात बँकेने कर्ज न दिल्यास मागणार आत्महत्येची परवानगी, शेतकरी संतप्त

गुरुदेव वनदुधे

पचखेडी (जि. नागपूर ) :  सरकार शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहे. मात्र, ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पाहिजे तितके प्रयत्न होताना दिसत नाही. कर्जमाफी झाल्याची घोषणा केली. मात्र, त्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागत आहे. आठ दिवसांच्या आत कर्ज न दिल्यास आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार असल्याचे अन्यायग्रस्त शेतकरी राजकुमार ठवकर यांनी सांगितले.

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी केली. त्यात नव्याने पिककर्ज देण्यासाठी आदेश पारित केले. पिककर्ज म्हणजे पिक लागवडीपासून पीक निघेपर्यंत येणारा खर्च भागवून आलेल्या उत्पन्नातून कर्ज परतफेड करणे. मात्र, आजघडीला खरीप हंगाम गेला असून रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. मात्र, येथील शेतकरी राजकुमार ठवकर पिककर्जासाठी दोन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवित आहेत. शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी सावकराकडून कर्ज घेऊन नंतर बँकेचे कर्ज मिळाल्यानंतर सावकाराचे पैसे द्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत कमलाबाई ठवकर यांचे नाव होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने वारसदार असलेला मुलगा राजकुमार ठवकर यांनी कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा दोन महिने लोटल्यानंतरही आजपर्यंत त्यांना पिककर्ज मिळालेले नाही. तेव्हा सरकार पिककर्ज देते की मळणी कर्ज, असाही प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.

राजकुमार ठवकर यांच्या कर्जाची फाईल झोनल ऑफिसला पाठविलेली आहे. माझा कोणताही ग्राहक नाराज होणार नाही याची मी काळजी घेतो. पण त्यांची फाईल पास होऊन आली नसल्याने विलंब होत आहे.
-गौरवकुमार, व्यवस्थापक, अलाहाबाद बँक शाखा, पचखेडी

मला पिककर्जाची अत्यंत गरज असल्याने कर्जाची मागणी केली. आता उधारउसने व्याजाने सावकारांकडून कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. त्यातही निसर्गाने दगा दिल्याने तेही पीक नेस्तनाबूत झाले. आता रब्बी पिकांची लागवड कशी करायची, हा मोठा यक्षप्रश्न आहे.
-राजकुमार ठवकर, युवा शेतकरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT