five crore expenditure only for oxygen every year in nagpur government medical college
five crore expenditure only for oxygen every year in nagpur government medical college 
नागपूर

'मेडीकल'मध्ये ऑक्सिजनवर दरवर्षी पाच कोटींचा खर्च, प्लांट उभारल्यास कोट्यवधींची बचत

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारादरम्यान रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दरवर्षी पूर्वी अडिच कोटी रुपये खर्च होत होते. आता ऑक्सिजन प्लान्टची क्षमता वाढली. यामुळे पाच कोटींवर भार शासनाच्या तिजोरीवर पडतो. कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी दहा कोटी रुपये खर्चून ऑक्‍सिजन प्लांट तयार करण्याचा प्रस्ताव तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी तयार केला होता. मात्र ,पुढे या प्लान्टचे काय झाले हे कळायलाच मार्ग नाही. 

सध्या मेडिकलमध्ये २० केएलचे तीन ऑक्सिजन प्लान्ट आहेत. ही क्षमता बऱ्यापैकी आहे. यामुळे प्लान्टमुळे मेडिकलमध्ये यापुढे ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही. मात्र, यासाठी दरवर्षी ५ कोटींचा भुर्दंड मेडिकलच्या तिजोरीवर बसणार आहे. हा खर्च वाचवण्यासाठीच तत्कालीन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी टीबी वॉर्ड परिसरात हा प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला होता. सध्या आधुनिक यंत्रणेद्वारे गंभीर रुग्णांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यासाठी मेडिकलमध्ये 'सेंट्रलाइज ऑक्‍सिजन सप्लाय सिस्टिम' बसवलेली आहे. शंभर टक्के वापर याच सिस्टिमद्वारे व्हावा या हेतूने लिक्विड प्लान्ट उभारण्यात येणार होता. परंतु, डॉ. निसवाडे निवृत्त झाल्यानंतर मात्र या प्रकल्पाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. काही ठिकाणी अद्यापही सिलिंडरद्वारेच पुरवठा होतो. विशेष असे की, मेडिकलमधील हा प्लांट तयार झाल्यानंतर मेयोसह विदर्भातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ऑक्‍सिजनचा पुरवठा सहज करता होईल इतका साठा मेडिकलच्या या प्लान्टमध्ये उपलब्ध राहणार होता. 

हवेतून घेण्यात येईल ऑक्‍सिजन -
पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायूचे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे. हवेतून हा ऑक्‍सिजन घेता येतो. या प्रकल्पाअंतर्गत हवेतूनच ऑक्सिजन घेण्यात येणार होता. यासाठी आधुनिक यंत्रणा उभारण्यासाठी ते प्रयत्नशील होते. ५० लाख लीटरची एक टाकी तयार करून टाकीत साठवलेला ऑक्‍सिजन पुढे लिक्विडमध्ये रूपांतरित करून तो पुरवण्याचा आराखडा करण्याचे त्यांनी ठरवले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT