Full results will come within a week by Nagpur university 
नागपूर

आठवडाभरात येणार पूर्ण निकाल; ६३७ निकालांची घोषणा, यंत्रणा कामाला

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा संपल्या असून आता विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. अद्याप विद्यापीठाचे ६३७ निकाल लागले असून एका आठवड्यात उर्वरित ३८० निकाल लावण्यात येणार आहे. आज विद्यापीठाद्वारे बीए आणि बीएसस्सीचा निकालाची घोषणा करण्यात आली.

विद्यापीठाद्वारे ८ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान अंतिम सत्रातील १ हजार २० अभ्यासक्रमांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेदरम्यान विद्यापीठाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्या अडथळ्यांची शर्यत पार करीत विद्यापीठाने यशस्वीरीत्या परीक्षा पार पाडली. आता विद्यापीठासमोर वेळेत निकाल लावण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे परीक्षा विभागाची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे.

निकालात सर्वाधिक विद्यार्थी बीए, बीकॉम आणि बीएसस्सी अभ्यासक्रमाचा समावेश आहे. विद्यापीठाद्वारे या अभ्यासक्रमाचे निकाल जवळपास लावण्यात आले आहेत. आता केवळ एमए, एम.कॉम, एमएसस्सी यासारख्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. हे सगळे निकाल ३० नोव्हेंबरपूर्वी लावण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

आज विद्यापीठाद्वारे बीए आणि बीएसस्सीचा निकालाची घोषणा करण्यात आली. यामध्ये बीएसस्सी अभ्यासक्रमात ९ हजार ८६८ तर बीए अभ्यासक्रमात दहा हजारावर विद्यार्थी होते. यानंतर इतर सेमिस्टरच्या अभ्यासक्रमांची महाविद्यालयस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे.

डिसेंबर महिन्यात पदव्युत्तर प्रवेश

अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल आल्यावर पदव्युत्‍तर अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाद्वारे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यानंतर महाविद्यालय आणि विभागातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहे. मात्र, हे वर्ग ऑनलाइन की प्रत्यक्ष याबाबत सरकारकडून आलेल्या दिशानिर्देशानंतरच स्पष्ट होणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT