gold stolen by youth in nagpur crime news 
नागपूर

कपाटाची नवी चावी घेऊन घरी आले दोन तरुण अन् घरमालकाला बसला जबर धक्का

योगेश बरवड

नागपूर : डुप्लिकेट चावी तयार करून देणारी टोळी मुद्देमाल लांबवत असल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. नंदनवन हद्दीत असेच एक प्रकरण पुढे आले आहे. चावी तयार करून देणाऱ्यांनी कपाटातील सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लांबविला. 

नंदनवनच्या गुरुदेव नगरातील प्रतिभा देशमुख (वय ६०) यांनी कपाटाचे कुलूप दुरुस्तीसाठी २० डिसेंबरला दोन अनोळखी युवकांना घरी बोलावले. दोघांनीही पाहणी केली व दुसऱ्या दिवशी नवीन कुलूप आणून लावणार, असे सांगून निघून गेले. २४ डिसेंबरला दुपारी देशमुख घरा एकट्याच असताना ते पुन्हा आले. नवीन कुलूप आणल्याचे सांगून ते कपाटाला लावले आणि नवीन चावी त्यांच्याकडे दिली. ती चावी दुसऱ्या लॉकरला लागते काय हे तपासून घेण्यासाठी अन्य लॉकरबाबत विचारणा केली. देशमुख यांनी बेडरूममधील कपाट दाखविले. तरुणांनी त्या कपाटाला चावी लावून बघितली. त्यानंतर कुलूप खराब झाल्याचा बहाणा करीत नवी चावी दुसऱ्या दिवशी आणून देण्याचे सांगून निघून गेले. देशमुख यांना शंका आली. त्यांनी बेडरूमचे कपाट उघडून बघितले असता सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे दिसले. नंदनवन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

केअर टेकरने चोरल्या सोन्याच्या पाटल्या - 
नागपूर : मदतीसाठी आलेल्या केअर टेकरने घरातील सोन्याच्या पाटल्या लांबविल्याची घटना गिट्टीखदान हद्दीत उघडकीस आली. भोपाळचे रहिवासी वीरेंद्र प्रताप सिंग (वय ६८) हे फ्रेंड्स कॉलनी येथील रोहित सिंग (वय २२) या पुतण्याकडे दहा दिवसांच्या मुक्कामासाठी आले होते. त्यांनी केअर टेकरचे काम करणारा भावेश दुबे (वय २३) रा. पूर्व फारुखाबाद, उत्तर प्रदेश याला सोबत आणले होते. वीरेंद्र प्रताप सिंग मुक्कामी असणाऱ्या खोलीतील कपाटात १ लाख ३३ हजार रुपये किमतीच्या पाटल्या व ८ हजार रुपये रोख ठेवले होते. हा मुद्देमाल दुबे याने लांबविला. गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

वीजखांबांसह १२ लाखांचा मुद्देमाल लंपास - 
नागपूर : उप्पलवाडी रेल्वे क्रॉसिंग ते कवठा सबस्टेशनदरम्यान वीजलाइन प्रस्तावित आहे. या कामासाठी संबंधित कंत्राटदार कंपनीने ऑक्टोबरमध्ये साइवर लोखंडी खांब, अ‌ॅल्युमिनियम तारा व केबल आणून टाकले होते. त्यातील ३२ खांब व अन्य साहित्य असा एकूण १२ लाख २९ हजार ८९८ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. रविकांत पाटील यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT