file 
नागपूर

हिरवेहिरवे रान ठरले मुक्‍या प्राण्यांसाठी अखेर जिवघेणे, कसे काय....

सकाळ वृत्तसेवा

मोवाड (जि.नागपूर) : मोहदी(दळवी)शिवारात नाल्याशेजारी असलेले हिरवे गवत खाण्यासाठी तक्रारकर्त्यांनी त्याच्या चार गाई तेथे बांधल्या. ठेक्‍याने केलेल्या शेतातून तक्रारकर्त्याच्या शेतात जाण्याचा मार्ग आहे. त्यावरून गाई-वासरांची ने-आण करण्याच्या कारणावरून तक्रारकर्ता व शेतठेकेदार यांच्यामध्ये नेहमीच वादग्रस्त खटके उडायचे. त्यावरून ठेकेदारानेच त्या हिरव्या गवतावर कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे चार गाईंचा नाहकच मृत्यू झाला. तक्रारीन्वये नरखेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गाईवासरांवरून नेहमी व्हायचा वाद
तक्रारकर्ते रवींद्र पांडुरंग डोंगरे (वय 50, नरखेड) यांची नरखेड ठाण्याअंतर्गत 8 एकर शेती आहे.
त्यापैकी ते 4 एकर शेतीची मशागत करतात. उर्वरित 4 एकर शेती त्यांचा थोरला भाऊ पुरुषोत्तम डोंगरे सांभाळतो. पुरुषोत्तमने आपले शेत विठ्ठल रेवतकर नामक व्यक्तीला ठेक्‍याने दिले. रवींद्रची वहीवाट करण्याचा रस्ता हा पुरुषोत्तमच्या शेतातूनच आहे. पण, ठेकेदार व रवींद्र यांच्या शेतमार्गावरून गाई-वासरे ने-आण करण्याच्या कारणावरून नेहमीच वाद व्हायचा. यात ठेकेदार व त्यांची मुले रवींद्रला नेहमीच धमकावीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तोंडावाटे निघू लागला फेस
28 जूनला दुपारी रवींद्र डोंगरे यांनी गाई शेताशेजारील नाल्याजवळ हिरवे गवत खाण्यासाठी बांधल्यात व वासरे गोठ्यात बांधली. नंतर ते घरी निघून गेल्यावर सायंकाळी त्यांचा मुलगा हेमंत गाईचे दूध काढण्यासाठी शेतात गेला. बांधलेल्या गायीपैकी तीन गाई हिरवे गवत खाऊन मृत्युमुखी पडल्याचे दिसले. काही वेळाने चौथ्या गाईच्या तोंडातून फेस निघत असताना मृत्यू झाल्याचे आढळले. त्या चारही गाईंची अंदाजे किंमत 30 हजार रुपयांच्या असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा : हिरवे स्वप्न फुलण्यापूर्वी जमिनीतच "दफन' झाले बियाणे, असे काय झाले...

ठेकेदारावर गुन्हा दाखल
या प्रकरणी रवींद्र डोंगरे यांनी 29 जूनला नरखेड पोलिस ठाण्याला तक्रार नोंदवून शेती ठेकेदार व त्यांच्या मुलांवर गोहत्या गुन्ह्याची नोंद करण्याची मागणी केली. त्यानुसार, मृत गाईंचे नरखेड पशुवैद्यकीय दवाखाण्यात डॉ. महेंद्र चव्हाण यांनी शव विच्छेदन केले. नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविल्याचे कळते. तक्रारीन्वये पोलिस शिपाई भुजंग बन्सोड यांनी शेती ठेकेदार व संबंधितांवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सूर्यकुमारची विकेट घेणारा नाशिकचा रामकृष्ण घोष IPL 2026 स्पर्धेतून अचानक बाहेर; CSK ने केली मोठी घोषणा

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

SCROLL FOR NEXT