GST Revenue is decreased due to lack of employees  
नागपूर

हे काय चाललंय? कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तब्बल ५७७ पदे रिक्त तरीही भरती होईना.. जीएसटी महसूल घटला 

राजेश रामपूरकर

नागपूर : केद्रीय वस्तू व सेवाकर नागपूर विभागीय कार्यालयातील कामाचा बोझा वाढलेला असताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची ५७७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे वस्तू व सेवाकर भरण्यासाठी येणारे व्यापारी आणि व्यावसायिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. परिणामी, कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण वाढला आहे. नागपूर विभागीय कार्यालयात १४९२ पदे मंजुर असून त्यातील फक्त ९१५ पदावरील कर्मचारी कार्यरत असल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. यामुळेच जीएसटी महसूल प्रभावीत झालेला आहे. 

नागपूर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वाढते काम लक्षात घेता कर्मचाऱ्यांची भरती करावी अशी मागणी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ कस्टम्सचे अध्यक्ष व सेंट्रल एक्साईज व जीएसटी एससी, एसटी एम्प्लाई वेलफेअर ऑर्गरायनाझेशनचे संजय थूल यांनी केली आहे. डीजीएचआरडीद्वारे अपलोड केल्या जाणाऱ्या आकड्यानुसार सीजीएसटी नागपूर झोनमध्ये मंजूर पदाची संख्यापैकी ५७७ पदे रिक्त आहेत. 

करदात्यांची संख्या हजारांमध्ये आहे. तर यांच्या देखरेखीसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोजकीच आहे, काही कार्यक्षेत्रांमध्ये केवळ एक अधीक्षक आणि निरीक्षक काम करीत आहेत. यामुळे त्यांच्यावरील कामाचे बोझ वाढलेले आहे. या स्थितीत कराचे लक्ष्य साध्य करणे अवघड आहे. निरीक्षक, अधीक्षक आणि कर साहाय्यकांचे सर्वाधिक पदे रिक्त आहेत. नागपूर विभागात नागपूर १, नागपूर दोन, ऑडिट नागपूर, औरंगाबाद, नाशिक, सीसीओ, अपील नागपूर, अपील नाशिक आणि विशेष आर्थिक क्षेत्राचा समावेश आहे. 

आज विभागात कार्यरत कर्मचारी, अतिरिक्त कामाचा बोझ्याखाली दबलेले आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अतिरिक्त कामे पूर्ण होऊ शकण्यास अडचण निर्माण होत आहे. डाटा बेसचे मेन्टनन्स, करदात्यासोबत पत्रव्यवहार करणे, मागणी नोटीस जारी करण्यासारखी कामे कर्मचारी नसल्याने रखडलेली आहेत. कर चोरीवर अंकुश बसविण्यासाठी मुख्यालय स्तरावर विशेष टास्क फोर्स गठीत करण्यासाठीही काही पुढाकार घेण्यात आलेला नाही. देशात वाढत्या बेरोजगारांचा प्रश्न गंभीर होत असताना नवीन कर्मचारी भरती करण्यात यावी अशी मागणी पंतप्रधान यांना पाठविलेल्या पत्रातूनही केलेली आहे. 

मानव संसाधन विकास महानिदेशालय, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाद्वारे आपल्या वेबसाइटवर अपलोड केलेल्या आकड्यावरून देशभरात ४० हजारापेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. देशात सीबीआयसीमध्ये कर्मचाऱ्यांची मंजूर पदे  ९१ हजार ७०० आहे. तर एक जानेवारी २०२० पर्यंत भरण्यात आलेल्या पदांची संख्या ५१ हजार ०९१ आहे. त्यानुसार ४० हजार ६०९पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्याचा थेट प्रभाव जीएसटी महसुलावर होत आहे. यामुळेच सीजीएसटी प्रतिष्ठानाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे, असेही थूल म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT