Increased corona patients more than corona recovery in Nagpur
Increased corona patients more than corona recovery in Nagpur 
नागपूर

धोक्याची घंटा! कोरोनामुक्तांपेक्षा वाढले अडीच पट कोरोनाबाधित; पाच मृत्यूंसह ३१९ नवीन बाधित

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोनावर मात करणाऱ्यांपेक्षा बाधितांची संख्या अडीच पटींनी वाढली आहे. बुधवारी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या केवळ १३८ तर कोरोनाबाधितांची संख्या ३१९ होती.

एक नोव्हेंबरला कोरोनाबाधितांपेक्षा अडीच पटीने कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढली होती. बाधित १९२ आढळून आले होते तर ५३५ व्यक्तींनी कोरोनावर मात केली होती. बाधितांचा आतापर्यंतचा आकडा एक लाख ९ हजार ८८० वर पोहोचला आहे. मागील २४ तासांमध्ये ५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूचा आकडा ३ हजार ६२० झाला आहे.

१० नोव्हेंबरपासून पुन्हा कोरोनाची दहशत वाढली आहे. १०० पेक्षा कमी झालेली संख्या ३०० पार येत आहे. बुधवारी आढळून आलेल्या ३१९ कोरोनाबाधितांमध्ये शहरात २६८ तर ग्रामीण भागातील ५० आणि जिल्हाबाहेरील एका बाधितांचा समावेश होता. तर ५ मृत्यूंपैकी केवळ १ मृत्यू ग्रामीण भागातील आहे. ३ मृत्यू शहरातील आहेत. तर एक मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे. नागपूर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या रुग्णालय आणि गृहविलगीकरणातील रुग्णांची एकूण संख्या ४ हजार ५२१ झाली आहे.

गृहविलगीकरणातील रुग्ण तीन हजार पार

दोन हजार ९०८ वर आलेला गृलविलगीकरणातील आकडा पुन्हा तीन हजारपार झाला आहे. बुधवारी गृहविलगीकरणात तीन हजार १४७ जण असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुक्तांची टक्केवारी ९२ वर आली आहे. बुधवारी केवळ १३८ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनामुक्तांचा आकडा एक लाख एक हजार ७३९ झाला आहे.

साडेसात लाख चाचण्या

बुधवारी दिवसभरात सहा हजार ३३३ चाचण्या झाल्या आहेत. यातील १,२३४ चाचण्या ग्रामीण भागात तर पाच हजार ९९ चाचण्या शहरात झाल्या आहेत. आतापर्यंत एकूण सात लाख ५१ हजार ३६७ चाचण्या झाल्या आहेत. यातील चार लाख २२ हजार ७५२ आरटी पीसीआर चाचण्या तर तीन लाख २८ हजार ६१५ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत. आजही सर्वाधिक १,८९८ चाचण्या खासगी प्रयोगशाळेत झाल्या आहेत.

मृतांची आकडेवारी

  • मेडिकलमध्ये आतापर्यंत १,४१७ मृत्यू
  • मेयोत आतापर्यंत १,२६२ मृत्यू
  • खासगीत आतापर्यंत ९१० मृत्यू
  • एम्समध्ये आतापर्यंत २० मृत्यू

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT