Kovids havoc 19 settlements dangerous, Laxminagar zone hotspot
Kovids havoc 19 settlements dangerous, Laxminagar zone hotspot 
नागपूर

कोविडचा कहर : अपार्टमेंट व घरे सील; १९ वस्त्या धोकादायक, लक्ष्‍मीनगर झोन ‘हॉटस्पॉट’

राजेश प्रायकर

नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने पाच किंवा त्यापेक्षा जास्त बाधित आढळून आलेले अपार्टमेंट, घरे सील करण्याची कारवाई सुरू केली. विविध १९ वस्त्यांमधील घरे, अपार्टमेंट सील केली आहेत. यात लक्ष्मीनगर झोनमधील सर्वाधिक घरे, अपार्टमेंट, आस्थापनांचा समावेश आहे. त्यामुळे हा झोन तूर्तास हॉटस्पॉट ठरला आहे. 

महापालिकेने धडक कारवाई करताना आतापर्यंत १९ वस्त्यांमधील अपार्टमेंट, घरे सील केली. याशिवाय तीन वस्त्यांतील आस्थापनांमध्ये कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने तेही सील केले. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक अपार्टमेंट, घरे, इमारती तसेच आस्थापनांचा समावेश आहे. लक्ष्मीनगर झोनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमधील कर्मचारी बाधित आढळले. याशिवाय बजाजनगरातील पिझ्झा हट आणि तिरुपती को-ऑपरेटिव्ह बॅंकमधील कर्मचारी बाधित आढळल्याने ही कार्यालयेही सील केली.

इंद्रप्रस्थ ले-आऊटमधील इमारत, जयताळा येथील पायोनिअर ट्युलिप इमारत, अंकुर अपार्टमेंट, लक्ष्मीकेशव अपार्टमेंट, तात्या टोपेनगरातील घर, राजीवनगरातील घर, सरस्वती विहारमधील श्रेयस साई अपार्टमेंट, पुनम विहारमधील संचयनी प्रेस्टिज अपार्टमेंट बाधित रुग्णांमुळे सील केले आहे.

धरमपेठ झोनमधील पांढराबोडी वस्तीतील घरे, गिरीपेठेतील साई मंगल अपार्टमेंट, रामदासपेठेतील पार्क क्यू इमारत, हनुमाननगर झोनमधील लाडीकर ले-आऊटमधील घर, राजापेठेतील गोविंदप्रभूनगरातील घर, धंतोली झोनमधील टाटा कॅपिलट हाईटमधील टॉवर चार सील केले.

याच झोनमधील अरिहंत अपार्टमेंटमध्येही पाचपेक्षा जास्त बाधित आढळल्याने प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले. नेहरूनगर झोनमधील वाठोडा येथील स्वामी नारायण एन्क्लेव्ह अपार्टमेंट, लकडंज झोनमधील नैवेद्यम इस्टोरिया हॉल, मंगळवारी झोनमध्ये मेकोसाबागेतील क्लार्क टाऊनमधील गोपाला अपार्टमेंट आणि या झोनमधील स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे कर्मचारीही बाधित आढळून आल्याने येथे सील ठोकले आहे. 

मंगल कार्यालय, प्रशिक्षण संस्थांवर दंड

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने आज ९२ मंगल कार्यालये, प्रशिक्षण संस्थांची पाहणी केली. यातील १८ मंगल कार्यालय व प्रशिक्षण संस्थांवर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा तसेच विनामास्क वापर, २०० पेक्षा जास्त नागरिकांची गर्दी दिसून आल्याने दंड ठोठावला. उपद्रव शोध पथकाने या सर्वांकडून १ लाख ८२ हजारांचा दंड वसूल केला. 

धंतोलीत बार, रेस्टॉरंटवर कारवाई

धंतोली झोनमध्ये उपद्रव शोध पथकाने बार व रेस्टॉरेंटवर मास्कशिवाय ग्राहकांचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी दंड ठोठावला. यात मानेवाडा रोडवरील ओझम बार तसेच पुरुषोत्तमनगरातील कीर्ती रेस्टॉरेंटचा समावेस आहे. लक्ष्मीनगर झोनमधील वर्धा रोडवरील पोहेवाल्यावरही पाच हजारांचा दंड ठोठावला. 

कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटकडूनही दंड वसूल

मंगळवारी झोनमधील सदर येथील दिशा कॉम्प्युटर व स्पेक्ट्रम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटससह अलकरीन इन्स्टिट्यूट, फॅसि डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडवरही दंड ठोठावण्यात आला. या आस्थापना संचालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या इन्स्टिट्यूटमध्ये सोशल डिस्टन्सिंग व मास्कबाबत नियमाचे उल्लंघन करण्यात आले. 

हॉटस्पॉट क्षेत्रात कोविड चाचणी शिबिरे

शहरातील हॉटस्पॉट क्षेत्रात बाजारपेठेत, सोसायटीमध्ये विशेष कोविड चाचणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. दूध विक्रेता, भाजी विक्रेता, घरकाम करणाऱ्या मोलकरीण यांचीही चाचणी करण्यास सुरुवात करण्यात आली. आज गांधीबागेतील तहसिल पोलिस स्टेशन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय, सिव्हिल लाइन्स येथील आईबीएम, लोणारा येथील सेन्ट्रल इंडिया कॉलेजमध्ये चाचणी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT