The living patient was shown dead Nagpur hospital news 
नागपूर

बुढी मेल्याने घरी जमले नातेवाइक व मांडव टाकले; मात्र, काही वेळानी वद्ध महिला घरी चालत आली

केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना महामारीमुळे सारे जग संकटाक सापडले आहे. पेशंटची गर्दी होत असल्याने रुग्णालयाकडून काही गंभीर चुका होत आहेत. ज्यामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. आधीच सर्वत्र दुखःचे सावट असताना ठणठणीत रुग्णाला जर मृत दाखविले तर त्यांची काय परिस्थिती होईल हे त्या कुटुबींयानाच माहित. अशीच एक घटना शहरातील एका खासगी रुग्णालयात घडली.

कोरोनाच्या महामारीने जगणेच बदलले. कोरोना झालेली व्यक्ती घरी परत येईल की, नाही हे सांगणे कठीण झाले आहे. त्यातच खासगी रुग्णालयांवर लुटारू बनल्याचा ठपका नातेवाईकांकडून ठेवण्यात येतो. या काळात कुटुंबीयांना प्रचंड मन:स्ताप सोसावा लागत आहे. मात्र, अशातच काळजाचा ठोका चुकविणारी प्रसंग नागपुरातील एका खासगी रुग्णालयात घडला.

कोरोनाचा संशय आल्याने उपचारासाठी दाखल महिलेस रुग्णालय प्रशासनाने चक्क मृत घोषित केले. घरी अंत्यसंस्कारानंतरची परंपरा निभावण्यात येत असतानाच ती महिला चक्क चालत घरी आली. हा सारा प्रकार बघून सारेच अवाक झाले. असा भोंगळ कारभार खासगी खासगी रुग्णालयात सुरू आहे. जिवंत महिलेस मृत घोषित करणाऱ्या या रुग्णालयावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.

रुग्णालयात गेल्यानंतर काही वेळातच रुग्ण दगावल्याचे अनेक प्रकरणे आहेत. मात्र, एक जिवंत असताना मृत दाखवण्याचा हा प्रकार अफलातून आहे. विशेष असे की, त्या खासगी रुग्णालयाने मृत्यू प्रमाणपत्रही तयार करण्याचा पराक्रम केला. आशाबाई चंद्रभा मून (वय ६३) असे  आहे. काशीनगर येथे त्या राहतात. कोरोना झाल्याने शुक्रवारी रात्री १०.३० वाजता वर्धा मार्गावरील जामठा येथे असलेल्या आय.जी.पी.ए. हॉस्पिटल रिसर्च सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक घरी परतले.

शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास कुटुंबीयांना रुग्णालयातून फोन आला. त्यांचा रुग्ण दगावला. त्यामुळे कुटुंबीयात दु:खाचे वातावरण पसरले. काही नातेवाईक रुग्णालयात धडकले. दु:खद घटना घडल्याने घरी मंडप टाकण्यात आला. नातेवाईकांनाही दु:खद बातमी सांगून बोलावून घेण्यात आले. रुग्णालयात गेलेल्या महिलेचा भाऊ नरेश ढेंगरे व इतरांना रुग्णालयाने रुग्णाच्या अंगावरील दागीने दिले. तेव्हा नातेवाईकांनी दागीने रुग्णाचे नसल्याचे सांगितले.

त्यानंतर रुग्णालयाने आणखी दुसरे दागीने  दिले. ते देखील आमच्या रुग्णाचे नसल्याचे सांगत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. नातेवाईकांनी शंका आल्याने काहींनी थेट रुग्ण भरती असलेल्या वॉर्डात धडक दिली. त्यावेळी रुग्ण खाटेवर बसून होती. रुग्णावर रुग्णालयाकडून कुठलीही औषधीही दिली नव्हती. रात्री केवळ दोनच बिस्कीटे दिली.

रुग्ण सुखरूप असल्याचे बघून कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. तर रुग्णालयाच्या भोंगळ कारभार व अक्षम्य दुर्लक्षामुळे तीव्र संताप उमटला. दरम्याच्या काळात घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही सामाजिक कार्यकर्ते रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयाच्या बाऊंसर्सने त्यांना रोखले. परंतु, तरुणांनी प्रवेशद्वार उघडून रुग्णालयाच्या व्यवस्थापनाविरुध्द संताप व्यक्त केला.

रुग्णाची आरटी पीसीआर चाचणी केली नाही

संशयित कोरोनाच्या रुग्ण महिलेस उपचारासाठी दाखल केले. यानंतर मृत दाखवले. यामुळे नातेवाईकासह ही महिला शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास घरी पोहचली. या महिला रुग्णाला दाखल केल्यानंतर दहा ते पंधरा तास उलटून गेल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी केली नाही. रुग्णाच्या नातेवाईकाकडून २० हजाराचे बील उकळण्यात आले. रुग्ण महिला सद्या घरी सुखरूप आहे. मात्र, जिवंत रुग्णास मृत दाखविण्याचा प्रकाराने झालेला मानसिक छळ व रुग्णालयाच्या बेपवाईविरोधात कुटुंबीयांनी हिंगणा पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT