Madhav Gopal Vaidya opossed national emergency while doing journalism  
नागपूर

‘विनाश काले विपरीत बुद्धी’ असा अग्रलेख लिहीत मा. गो. वैद्य यांनी केला होता आणीबाणीचा प्रखर विरोध

अथर्व महांकाळ

नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जेष्ठ स्वयंसेवक आणि विधानपरिषदेचे माजी सदस्य बाबुराव उपाख्य मा. गो. वैद्य यांचं आज दुपारी ३.३० वाजता वृद्धपकाळानं निधन झालं. ते ९८ वर्षांचे होते. थोर विचारवंत, पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार आणि जनसामान्यांना समजून घेणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. अगदी घराजवळच्या कचऱ्याच्या मुद्यापासून ते देशाच्या सुरक्षेच्याबाबतीत त्यांनी स्वतःचे परखड मत मांडले होते. आणीबाणीच्या काळात त्यांचं कामगिरी उल्लेखनीय होती. उमा भारती

कोण होते माधव गोविंद वैद्य 

माधव गोविंद वैद्य, असं त्यांचं पूर्ण नाव होतं. संघाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी सुरूवात केली. संघाच्या आतापर्यंतच्या सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याची संधी त्यांना लाभली. संघाच्या मुखपत्राचे ते संपादकही होते. मा.गो. वैद्य यांनी संघावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 1966 पासून पुढे अनेक वर्षे पत्रकारिता करताना अनेक उत्कृष्ट अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहिणाऱ्या  मा. गो. वैद्यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते.  संस्कृत विषयात एम.ए. करण्यासाठी त्यांना किंग एडवर्ड मेमोरियल शिष्यवृत्ती मिळाली होती. 

महात्मा गांधींच्या हत्येनंतर राहिले भूमिगत 

मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले. त्याकाळात ते छान शर्ट, पॅंट, टाय लावून वावरत असायचे. त्यामुळे पोलिसांना संशय आला नाही. १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, या सरकारी फतव्यावर तसा करार करण्याचे बाणेदारपणे नाकारले.

आणीबाणीच्या काळात नोंदवला निषेध 

आणीबाणीचा काळ व त्या वेळच्या अडचणी आणि त्यातून काढलेले मार्ग हा मा.गो. वैद्य याच्या संपादकीय कारकिर्दीतल्या कायम आठवणीत असणारा काळ होता.आणीबाणीत सेन्सॉरशिप लागू झाल्यावर ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ हा त्यांचा अग्रलेख डाक आवृत्तीत छापला गेला; पण शहर आवृत्तीत सेन्सॉर अधिकार्‍याने छापू दिला नाही म्हणून अग्रलेखाची तेवढी जागा निषेध म्हणून त्यांनी मोकळी सोडली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Diversion : नाताळ सणानिमित्त लष्कर परिसरात वाहतूक बदल; एम. जी. रोडवर निर्बंध!

Pakistan Airline Sold: कंगाल पाकिस्तानच्या इंटरनॅशनल एअरलाइन्सची झाली विक्री!

Supriya Sule : दोन्ही राष्ट्रवादीत चर्चा सुरू; मात्र प्रस्ताव नाही– सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा!

Mundhwa Land Scam : पार्थ पवारसह संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा- अंजली दमानिया; मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण!

Interstate Car Racket : कार भाड्याने घ्यायचे, अन् बनावट कागदपत्रे बनवून विकायचे; आंतरराज्य टोळीचा बीडमध्ये पर्दाफाश; दोघे जेरबंद!

SCROLL FOR NEXT