making of a bridge is stopped from last 7 months in Gumgaon 
नागपूर

गुमगावात अर्धवट पुलाच्या बांधकामाला मुहूर्तच सापडेना; गेल्या ७ महिन्यांपासून काम रखडले 

विजयकुमार राऊत

गुमगाव (जि. नागपूर):  येथील वेणा नदीवरील जुना पूल पाडून नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. मात्र दोन वर्षांनंतरही पुलाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. बुटीबोरी आणि हिंगणा या दोन्ही औद्योगिक परिसरासह वर्धा तसेच नागपूरकडे जाण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या पुलाचे बांधकाम सात महिन्यापासून थंडबस्त्यात आहे. 

दुचाकी, चारचाकी वाहनधारकांसह शेतकरी, शेतमजुरांचे अतोनात हाल होत असून महिला, तरुणींची गैरसोय होत आहे. अर्धवट पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी संबंधित कंत्राटदार आणि बांधकाम विभागाला कधी मुहूर्त सापडेल असा सवाल आता विचारला जात आहे.

४ ऑगस्ट, १९७९ रोजी आलेल्या महापुरानंतर गुमगाव येथील वेणा नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात आले. ४० वर्षानंतर मोडकळीस आलेला पूल पाडून १० कोटी रुपये खर्चाच्या नवीन पुलाचे २१ डिसेंबर २०१८ रोजी आमदार समीर मेघे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम सात महिन्यापासून थंडबस्त्यात गेल्याने नागरिक संतापले आहेत. पुलाच्या अपूर्ण आणि रखडलेल्या कामांमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना निष्कारण त्रास सहन करावा लागतो आहे.

महिलांची गैरसोय

गुमगाव परिसरातील गुमगाव, कोतेवाडा, वागधरा, कान्होली, धानोली, शिवमडका, किरमटी, वडगांव-गुजर, दाताळा, सुमठाणा येथील महिला, तरुणी शेतीकामासह मिहान,फायर आर्कर, संदेश सिटी, वृन्दावन सिटी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घरकाम, ऑफिस काम, बागकाम, सुरक्षारक्षक आदी कामाला जातात. सायंकाळी कामावरून घरी परतत असतांना अर्धवट पुलामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहनधारकांसह महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेसाठी अर्धवट पुलाचे बांधकाम त्वरित पूर्ण करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वेणा नदीवरील अर्धवट पुलामुळे वाहनधारकांना धानोली, कोतेवाडा, सालईदाभा आणि अमरावती-जबलपूर महामार्गासारख्या दूरच्या पर्यायी मार्गावरून प्रवास करावा लागतो आहे. वाहनधारकांना जास्त वेळ,आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

ग्रामस्थांना वेळोवेळी होणारा त्रास दूर करण्यासाठी गुमगाव ग्रामपंचायतद्वारे वेणा नदीतून वाहतुकीस योग्य असा पर्यायी तात्पुरता रस्ता सर्वांसाठी तयार करण्यात आला आहे.
नित्यानंद बोडणे,
उपसरपंच, गुमगाव 
 
संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT