Men attacked on criminal in Nagpur  
नागपूर

खुनाच्या घटनेनं हादरली उपराजधानी: उपमुख्यमंत्री जाताच कुख्यात गुंडाचा दगडानं ठेचून खून 

अनिल कांबळे

नागपूर ः कुख्यात राजा गॅंगचा सदस्य असलेल्या विजय वागदरे याचा अज्ञात आरोपींनी दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना आज रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. धीरज आणि सुनील या दोन युवकांची संशयित आरोपी म्हणून नावे समोर आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय वागदरे हा कुख्यात गुन्हेगार होता. तो तिरूपती भोगे आणि वसिम चिऱ्या गॅंगवारमध्ये सहभाही होता. त्याच्यावर आतापर्यंत बरेच गुन्हे दाखल आहेत. तो वस्तीतील व्यापारी आणि दुकानदारांकडून वसूली करीत होता. तसेच सामान्य नागरिकांना दमदाटी करून लुटमारही करीत होता. आज रविवारी दुपारी चार वाजता विजयने झेंडा चौकात नारायणपेठमध्ये राहणाऱ्या एका मुलाला विणाकारण मारहाण केली. त्या मुलाची आई रडत रडत प्रेमनगरात आली. 

नागरिकांनी तिची विचारपूस केली असता विजयचे नाव समोर आले. दरम्यान विजयचे मित्र सुनील आणि धीरज हेसुद्धा तेथे आले. त्यांच्याकडे त्या मुलाच्या आईने तक्रार करीत विजयला समजून सांगण्याची विनंती केली. काही वेळातच विजय प्रेमनगरात आला. त्याने सुनील आणि धीरज यांनाही शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्‍या दोघांनी विजयवर दगड-विटांनी हल्ला केला. विजयच्या डोक्यात दगड घातल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांचे अपयश

विजय वागदरे याच्याविरूद्ध आतापर्यंत शांतीनगर पोलिस ठाण्यात डझनभर तक्रारअर्ज देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांनी तक्रारींना गांभीर्याने न घेतल्यामुळे विजयची हिम्मत वाढली. तसेच आज दुपारपासून विजय दारूच्या नशेत अनेकांना शिवीगाळ करीत होता. विजयच्या दशहतीमुळेच त्याचा गेम झाल्याचे बोलले जात आहे.

उपमुख्यमंत्री जाताच खून

शांतीनगरातील मुदलीयार लॉन येथे आयोजित उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचा जाहिर कार्यक्रम संपताच कुख्यात गुंडाचा खून केल्याची घटना घडली. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाला का? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.


संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT