MP Balu Dhanorkar Passed Away esakal
नागपूर

Balu Dhanorkar : खासदारांची प्रकृती गंभीर होती अन् काँग्रेसला लागलेली पदाची चिंता

खासदार बाळू धानोरकर (वय 48 वर्षे) यांचं 30 मे रोजी पहाटे नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपचारादरम्यान निधन झालं.

सकाळ डिजिटल टीम

चंद्रपूर : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर (वय 48 वर्षे) यांचं 30 मे रोजी पहाटे नवी दिल्ली इथं वैद्यकीय उपचारादरम्यान निधन झालं.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून (Chandrapur Lok Sabha Constituency) धानोरकर 2019 मध्ये निवडून आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूर इथं वैद्यकीय उपचार सुरू होते. नुकतंच त्यांना दिल्लीतील वेदांचा हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी आणण्यात आलं होतं. दोनच दिवसांपूर्वी त्यांचे वडील नारायण धानोरकर यांचं निधन झालं होतं.

मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर प्रदेश काँग्रेस (Congress) आणि जिल्ह्यातील धानोरकर विरोधकांना त्यांचं काही सोयसुतक नसल्याचं समोर आलंय. काल खासदार धानोरकरांची (Balu Dhanorkar) प्रकृती चिंताजनक असतानाच काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी (प्रभारी) आमदार सुभाष धोटे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज धानोरकरांचं निधन झालं.

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी युती केली. विजयानंतर या दोघांनीही आनंदोत्सवात नृत्य केलं. याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं केल्यानंतर देवतळे यांना पदावरून कार्यमुक्त केलं.

देवतळे आमदार वडेट्टीवारांचे समर्थक आहेत. त्यांना कार्यमुक्त केल्यानंतर वडेट्टीवारांनी थेट नाना पटोले यांना लक्ष केलं होतं. दरम्यान, देवतळे यांची जबाबदारी शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्याकडं सोपविली. तिवारी खासदार धानोरकरांच्या गोटातील आहेत. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार झाला. याप्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

नोकरीसाठी सहा लाख रुपये रावत यांना दिले. ते परत केले नाही, म्हणून गोळीबार केल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिली. याप्रकरणात बँकेच्या एका संचालकाचीसुध्दा पोलिसांनी चौकशी केली होती. बँकेतील नोकर भरतीली दोन स्थगिती आली. याकाळात काही संचालकांनी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांकडून पैसे घेतले आहे. त्यामुळं या संचालकांची नार्को चाचणी करण्याची मागणी काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांनी केली.

त्यानंतर बँकेतील रावत समर्थक संचालक आणि आमदार सुभाष धोटे यांनी तिवारी यांना पदावरून काढा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली. तत्पूर्वी बँकेतील नवनियुक्त कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकांचा सत्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, आमदार सुधाकर अडबाले याच सत्कार समारंभात खासदार धानोरकरांना उमेदवारी देऊ नये अन्यथा त्यांना निवडणुकीत पराभूत करु असा इशारा बँकेचे संचालक (शिवसेना ठाकरे गट) रवींद्र शिंदे यांनी दिला. त्यावेळी धोटे आणि वडेट्टीवार गप्प होते.

आता मागील तीन दिवसांपासून खासदार धानोरकरांवर दिल्लीत उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांचं निधन झालं. मात्र, दुसरीकडे धानोरकर कुटुंबीयांना धीर देण्याऐवजी जिल्ह्यातील काँग्रेसचे काही नेते राजकारण करीत आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसच्या वर्तुळात उमटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT