Nagpur Crime  Esakal
नागपूर

Nagpur Crime: गुन्हेगारांच्या हॉटस्पॉटचा आढावा घेण्यासाठी पोलिसांनी कसली कंबर, कपिलनगर ते कळमनापर्यंत काढला रुटमार्च

नागपूर शहरातील संवेदनशील पोलिस ठाण्याच्या समावेश असलेल्या परिमंडळ पाचमधील ठाण्यांतर्गत असलेल्या गुन्हेगारांच्या ‘हॉटस्पॉट’चा आढावा घेण्यासाठी पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी कंबर कसली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur Crime Hotspot: नागपूर शहरातील संवेदनशील पोलिस ठाण्याच्या समावेश असलेल्या परिमंडळ पाचमधील ठाण्यांतर्गत असलेल्या गुन्हेगारांच्या ‘हॉटस्पॉट’चा आढावा घेण्यासाठी पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांनी कंबर कसली आहे. शुक्रवारी कपिलनगर ते कळमना येथील परिसरात रुट मार्च करीत परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांशी संवाद साधला.

महिनाभरापासून शहरात खुनासह, शस्त्रासह हल्ला करणे, घरफोडी, लुटपाट आणि इतर गंभीर घटना घडत आहेत. विशेषतः दारूचे दुकान, अवैधरीत्या चालणारे ठेले आणि चहा टपरी या ठिकाणी दिवसभर अनेक गुन्हेगार आणि समाजकंटक बसल्याचे दिसून येते. त्यामुळे तेथील वातावरण खराब होते. सामान्य माणसाच्या मनातही भीती निर्माण होते. त्यातूनच परिमंडळ पाचसह शहरात जानेवारी ते आत्तापर्यंत वीसहून अधिक खुनांच्या घटना घडलेल्या आहेत.

शिवाय इतरही शारीरिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे निकेतन कदम यांनी परिमंडळ पाचमधील गुन्हेगारांचे हॉटस्पाट शोधून काढत, त्या ठिकाणी गुन्हेगारांची बैठक बंद करण्यासाठी रूट मार्च काढला. परिसरातील सात ठिकाणी अवैधरीत्या चालविण्यात येत असलेल्या टपरी, दुकाने बंद करण्यात आली. (Latest Marathi News)

याशिवाय नागरिकांमध्ये असलेली भीती घालवित, पोलिस तुमच्यासोबत असल्याचा विश्‍वास दाखविला. जरीपटका अंतर्गत बाराखोली चौक येथून सुरू झालेला रुटमार्च श्रावस्तीनगर, राय क्लिनिक

रिपब्लिकननगर, मिसाळ लेआउट, मंगळवारी चौक, नागसेननगर ते भीम चौक, कपीलनगरातील म्हाडा क्वॉर्टर चौक, तक्षशिलानगर, कडू ले आऊट, कपीलवस्तू बौद्धविहार, कामगारनगर परिसर, यशोधरानगर ठाण्याअंतर्गत कांजी हाऊस चौक,मेहंदीबाग रोड, पोळा मैदान, कुंदनलाल गुप्ता नगर, फुकटनगर, इंदिरानगर, विटाभट्टी चौक, कळमना पोलिस ठाण्याअंतर्गत उडता हनुमान चौक, गोपालनगर, जुना (Latest Marathi News)

बाजार चौक, संजय गांधी शाळा, झेंडा चौक, गिल्लोर चौक, नागराज चौक, रेल्वे कॉलनी, कुंजारामवाडी मशीद, साखकरवाडी मदरसा, आर.टी.ओ. ग्राऊंड या ठिकाणी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT