diwali music news
diwali music news esakal
नागपूर

Nagpur : दिवाळी पहाट’ला स्वरांची मेजवानी

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. दोन वर्ष ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला खंड पडल्यानंतर आता निर्विघ्नपणे दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन शहरामध्ये होणार आहे.

माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, तेजस माजी सैनिक बहुद्देशीय संस्था, माजी वायू सैनिक कल्याण संघटनेतर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमात आलाप संगीत विद्यालय ‘मंगल पहाट दीपस्वरांची’ हा कार्यक्रम सादर करतील.

रविवारी (ता. २३) पहाटे ५.३० वाजता सक्करदरा तलावाजवळील सक्करदरा लेक गार्डन लॉनवर हा कार्यक्रम होईल. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार मोहन मते, सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित राहतील, अशी माहिती आलापचे अध्यक्ष श्‍याम निसळ यांनी दिली.

कलासंगम कला सांस्कृतिक मंडळ, केशवनगर सांस्कृतिक सभेतर्फे कीर्तन पहाट व ‘पहाट वारा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. २४) ह. भ. प. दिगंबरबुवा नाईक कीर्तन व मंगळवारी (ता. २५) ॠतुराजतर्फे मुग्धा तापस, गुणवंत घटवाई व कलावंत गायन सादर करतील. दोनही कार्यक्रम पहाटे ५.३० वाजता रेशीमबागेतील व्हॉलिबॉल मैदानावर सादर होतील.

महाल परिवार, संती गणेशोत्सव मंडळ, बडकस चौक मित्र परिवार व पं. बच्छराज व्यास स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिवाळी पहाट २०२२’ या हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. २५) पहाटे ५.३० वाजता महालमधील पं. बच्छराज व्यास चौक (बडकस चौक) येथे होईल.

गायक भूषण जाधव व कलावंत गाणे सादर करतील. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे रविवारी (ता. २३) ‘तेजोमय नादब्रह्म’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ७.३० वाजता सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे हा कार्यक्रम होईल. यामध्ये, डॉ. साधना शिलेदार, अनिरुद्ध देशपांडे यांना ऐकण्याची संधी मिळेल.

स्वरवेध संस्थेतर्फे ‘आनंदोत्सव २०२२’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त २४ ऑक्टोबर ते २७ आक्टोबर या चार दिवसात दिवाळी पहाट कार्यक्रम होतील. सकाळी ६ वाजता लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहामध्ये हे कार्यक्रम होतील, अशी माहिती ॲड. भानुदास कुलकर्णी यांनी दिली.

सोहम कलाविष्कारतर्फे यंदा रविवारी (ता. २३) व सोमवारी (ता. २४) सकाळी ६ वाजता ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी प्रतापनगर येथील रोटरी बालोद्यान येथे रोटरी क्लब नागपूर पश्चिममधील कलावंत गायन करतील. सोमवारी अजनी चौकातील पश्चिम समर्थनगर नागरिक मंडळाच्या सोनटक्के सभागृहाच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गजानन रानडे यांनी दिली.

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि श्री जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळ, रामनगरतर्फे रविवारी (ता. २३) नादब्रह्म कार्यक्रमांतर्गत भक्तिरंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६.३० वाजता रामनगर येथील जनार्दनस्वामी योगाभ्यासी मंडळात हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमात देवास, मध्यप्रदेश येथील गायिका कलापिनी कोमकली यांचे भक्तिगीताचे सादरीकरण होणार आहे.

अनिसतर्फे फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे फटाकेमुक्त दिवाळीचे आवाहन करण्यात आले आहे. फटाके बनवण्यासाठी मुख्यत्वे कागदाचा वापर होतो. यामुळे वृक्षांच्या तोडीला प्रोत्साहन मिळते. ही दिवाळी प्रदुषणाऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून पृथ्वीच्या तापमानातील वाढ थांबवत साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र अनिसतर्फे करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT