Journey of Abhijit Vanjari. 
नागपूर

एनएसयूआय ते पदवीधर आमदार, वंजारींचा राजकीय कारकिर्दीतील पहिलाच विजय

भाग्यश्री राऊत

नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकासआघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी तब्बल १८,७१० मतांनी निवडून आले. अभिजित वंजारी यांना ६१,७०१ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संदीप जोशी यांना ४२,९९१ मते मिळली. अभिजित यांच्या राजकीय कारकीर्दीमधील पहिलाच विजय आहे. यापूर्वी त्यांनी दोन विधानसभा निवडणुका, एक महापालिका निवडणूक लढविली होती. मात्र, त्यामध्ये त्यांना अपयश आले होते.

अभिजित वंजारी यांचा जन्म १० मे १९७३ रोजी झाला. त्यांनी नागपुरातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एलएलबी केले. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात १९८८ ते २००२ पर्यंत या काळात एनएसयूआयचे जनरल सेक्रेटरी म्हणून काम पाहिले. अभिजित वंजारी यांचे वडील गोंविदराव वंजारी आमदार होते. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा काँग्रेसचे उमेदवारीवर महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.

२००५ च्या निवडणुकीत दक्षिण नागपूर मतदारसंघातून त्यांचे वडील गोंविदराव वंजारी यांनी निवडणूक लढविली होती. ते विजयी देखील झाले होते. मात्र, आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याठिकाणी पोटनिवडणूक लागली होती. मात्र, काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही पोटनिवडणूक लढविली होती.

यावेळी त्यांना १९ हजार १५३ मते मिळाली होती. पण त्यातही अपयश आले. त्यानंतर ते परत काँग्रेसमध्ये आले. त्यांनी २०१४ मध्ये पूर्व नागपूर मतदारसंघातून विधानसबा निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना ५० हजार ५२४ मते मिळाली. मात्र, ते विजयापासून दूर होते.

अभिजित वंजारी यांनी भूषविलेली पदे

  • महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस माजी सचिव
  • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या युवक आणि स्पोर्ट्सचे माजी उपाध्यक्ष
  • नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जनगरल सेक्रेटरी आणि प्रवक्ते
  • उत्तर प्रदेश, बिहार, गोंदिया आणि तिरोडा - निवडणूक निरीक्षक
  • नागपूर विद्यापीठातील व्यवस्थापक कौंसिलचे सदस्य
  • नागपूर विद्यापीठातील सिनेट सदस्य
  • अमर सेवा मंडळ, नागपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव
  • गोविंद अर्बन क्रेडीट को.  सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष
  • गोंविदराव वंजारी फाऊंडेशनचे सचिव

अभिजीत वंजारी यांना मिळालेला पुरस्कार

  • बिझिनेस आयकॉन इन कॉफी बुक टेबल अवार्ड

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT