nagpur graduation constituency election result update 
नागपूर

भाजपचा बालेकिल्ला ढासळण्याची शक्यता; दुसऱ्या फेरतही महाविकास आघाडीचे अभिजीत वंजारी एकूण 7334 मतांनी आघाडीवर

अतुल मेहेरे

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १ डिसेंबरला मतदान झाले. आज येथील मानकापूर क्रीडा संकुलात मतमोजणी सुरू आहे. पहिल्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी हे एकूण ७३३४ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे संदीप जोशी दुसऱ्या स्थानावर असून त्यांना १६ हजार ९५२ मते मिळाली आहेत. त्यामुळे आता भाजपचा बालेकिल्ला ढासळणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पदविधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध भारताय जनता पक्ष अशी थेट लढत झाली. प्रचारादरम्यानही कधी महाविकास आघाडी, तर कधी भाजप मागेपुढे होत राहिले. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही नेमका अंदाज कुणाला लावता आलेला नव्हता. त्यामुळे पण गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढल्याने लढत अतिशय अटीतटीची झाली. त्यामुळे भाजपचा गढ यावेळी राखला जातो की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. त्यामुळे मतदानानंतरही राजकीय जाणकार अंदाज लावायला कचरत होते. पहिल्याच फेरीत अभिजित वंजारींनी आघाडी घेतल्यामुळे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांत आनंद तर भाजपच्या गोटात चिंता दिसतेय. 

आजवर भाजपचा या मतदारसंघात पराभव झाला नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्यासमोर विजयी परंपरा कायम राखण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस महाआघाडीने यंदा प्रथमच अ‌ॅड. अभिजित वंजारी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार दिला. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे बळ त्यांना मिळाले. याशिवाय त्यांनी सुमारे दीड वर्षाआधीपासून या मतदारसंघात मशागत केली. यंदा बसपाने आपला उमेदवार जाहीर केला नाही. वंचित बहुजन विकास आघाडीचा उमेदवार रिंगणात होता. असे असले तरी यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा थेट मुकाबला झाला. आता अभिजीत वंजारी पहिल्या फेरीत आघाडीवर असल्यामुळे भाजपच्या गढाला सुरूंग लागतो की काय? अशी चर्चा रंगली आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar on Parth Pawar land deal case : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अखेर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...

Mumbai: विरार ते अलिबाग आता फक्त काही मिनिटांत! महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सरकारी पाठबळ, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

TET Exam 2025: टीईटी संदर्भात शिक्षक परिषदेचे महत्वाचे आवाहन;...तर नुकसानीस उमेदवार जबाबदार राहतील

Pune Protest : 'टीईटी' च्या सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ; २४ नोव्हेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्याचा निर्णय!

Hybrid learning in MBA : एमबीए आणि पीजीडीएममधील हायब्रिड शिक्षण मॉडेल्सचा उदय: संधी आणि आव्हाने

SCROLL FOR NEXT