Nagpur rain news
Nagpur rain news esakal
नागपूर

Nagpur : घरांत पाणी शिरण्याच्या घटनांत वाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या दहा वर्षांत शहरातील अनेक वस्त्यांमधील घरांत पाणी शिरण्याच्या घटनांत मोठी वाढ झाली. शहरात सिमेंटीकरणाच्या पहिला, दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे झाले असून अनेक भागांमध्ये रस्ते उंच झाले. अंतर्गत वस्त्यांमध्येही रस्त्ये उंच व घरे खाली झाल्याने गेल्या दहा वर्षांत रस्त्यांवरील पाणी थेट नागरिकांच्या घरांत शिरत असल्याचे प्रकार वाढल्याचे दिसत आहे.

यावर्षी जुलैमध्ये चांगलाच पाऊस झाला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह वस्त्यांमध्ये, घरांमध्ये पाणी साचले. घरांमध्ये पाणी शिरण्याची मालिका २०१२ पासून सुरू झाली. शहरात २०११ पासून शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे तयार करण्यास सुरुवात झाली होती. २०१२ पूर्वी घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना अत्यल्प प्रमाणात असल्याचे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. २०१२ नंतर या घटनात वाढ झाल्याचे अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीतून उघड झाले.

शहरात २००८ मध्ये केवळ २१ घरांत पाणी शिरले. २००९ मध्ये केवळ ११, २०१० मध्ये ३७, २०११ मध्ये १८ घरांत पाणी शिरले. २०१८ ते २०११ या चार वर्षात एकूण ८७ घरांत पाणी शिरले. परंतु २०१२ मध्ये, एकाच वर्षात ९४ घरांमध्ये पाणी शिरले. २०१३ मध्ये तर या घटनेत अडीचपटीने वाढ झाली. या वर्षात २३३ घरांमध्ये पाणी शिरले. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत वस्त्यांमध्येही सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी खोदकाम करण्याऐवजी जुन्याच रस्त्यांवर सिमेंट रस्ते तयार केल्याने ते उंच झाल्याचे अनेक प्रकार घडले आहे. याबाबत महापालिका सभागृहातही त्या-त्यावेळी नगरसेवकांनी आवाज बुलंद केला. परंतु त्याकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे सिमेंट रस्ते उंच होणे सुरूच राहिले. त्यातूनच घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनाही वाढल्या.

२०१४ मध्ये केवळ २० घटनांची नोंद झाली. परंतु त्यापुढच्या २०१५ मध्ये १०६ घरांत पाणी शिरल्याची नोंद अग्निशमन विभागाने केली. पुढील सहा वर्षात २०१६ व २०१९ या वर्षांचा अपवाद वगळल्यास सर्वच वर्षामध्ये घरांत पाणी शिरल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात आहे.यंदा ३१ ऑगस्टपर्यंत ६४ घरांत पाणी शिरल्याच्या घटनांची नोंद झाली. याच काळात शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांचे जाळे पसरले. घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटनांसाठी नागरिकांनीही उंच सिमेंट रस्त्यांना दोषी ठरविले आहे.सिमेंट रस्त्यांचा विकासाशी संबंध जोडण्यात येत असला तरी त्याचा फटकाही नागरिकांना बसत असल्याचे दरवर्षी पावसाळ्यात अधोरेखित होत आहे.

उपराजधानीतील सिमेंट रस्त्यांचे जाळे

 पहिला टप्पा : २५.७७ किलोमीटर

 दुसरा टप्पा : ६६.३२ किलोमीटर

 तिसरा टप्पा : ३०० कोटींची कामे (३९ रस्ते)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : विभव कुमार यांना आजच कोर्टासमोर हजर केलं जाणार

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, दु:ख सहन न झाल्याने सहकलाकारानेही संपवलं जीवन!

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

SCROLL FOR NEXT