diwali faral news esakal
नागपूर

Nagpur : विदेशात मिळणार फराळातून मायेची ऊब

टपाल, कुरिअर, पार्सल सेवाद्वारे मिळणार फराळाचा आस्वाद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशांसह जगातील विविध देश कोरोना निर्बंधातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे टपाल आणि कुरिअर सेवेच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या दिवाळी फराळाचा सुगंध विदेशात दरवळणार आहे. विदेशातील भारतीय बांधवांना यंदा दिवाळी फराळाचा आस्वाद घेता येणार आहे. शहर जिल्ह्यातील काही हिंदू बांधव नोकरी, शिक्षण अशा विविध कामानिमित्त विदेशात वास्तव्यास आहे. त्यांना दिवाळीसाठी येणे शक्य होत नाही. अशा बांधवांना दिवाळीच्या आनंदासह दिवाळी फराळास मुकावे लागले होते. यंदा त्यांना भारतीय फराळांचा आस्वाद घेता येणार आहे.

कुटुंबीयांकडून टपाल, कुरिअर पार्सल सेवा माध्यमातून दिवाळी फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून फराळ पाठविण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे त्यांना कुठेतरी मायेची ऊब आणि दिवाळीचा आनंद मिळणार आहे. दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे विदेशातील बांधवांना या आनंदापासून मुकावे लागले होते. आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्याने पार्सल सेवादेखील कोलमडली होती. यंदा परिस्थिती सामान्य असल्याने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे टपाल विभागाची पार्सल सेवाही पूर्ववत झाली आहे. यामुळे दिवाळी फराळ विदेशातील बांधवांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. टपाल विभागाच्या माध्यमातून सुमारे शेकडो देशांमध्ये पार्सल सेवा सुविधा पुरविली जात आहे. या सेवेमुळे विदेशातील बांधवांना आजही भारतीय संस्कृतीची जोडून ठेवण्याचे काम होत आहे. याशिवाय कुरिअरच्या माध्यमातूनही पर्सल सुविधेला पसंती दिली जात आहे. फराळाच्या दरात फक्त दहा टक्केच वाढ करण्यात आलेली आहे.

या देशातून अधिक मागणी

टपाल विभागाने शेकडो देशात पार्सल सेवा उपलब्ध केली आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, रशिया, इंग्लंड, युरोप या प्रमुख देशांसह अन्य देशांचा यात समावेश आहे. यातील अमेरिका, दुबई, ऑस्ट्रेलिया इंग्लंड अशा चार देशांमध्ये भारतीय बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे. यामुळे दिवाळी फराळाची मागणीदेखील याच देशांमधून अधिक होत असते.

पार्सलची बांधणी

पूर्वी सर्व पार्सलची कापडाच्या आवरणात पॅकिंग केले जात होते. परंतु, बहुतांशी बांधव लिक्विड स्वरूपातील पदार्थ स्फोटके (फटाके) चा देखील पार्सलमध्ये पाठवत होते. त्यामुळे सुरक्षा कारणास्तव नागरिकांकडून आलेले अन्य पार्सलसह दिवाळीचे पदार्थांची बांधणी टपाल कर्मचाऱ्यांच्या समोर केली जाते. कर्मचाऱ्यांकडून पदार्थाची तपासणी करून परवानगी असलेले पदार्थच पाठविले जातात. सर्व पदार्थांची खोक्यांमध्ये बांधणी करून पार्सल स्वरूप दिले जाते. त्यावर कुठल्याही प्रकारचे कापडी आवरण लावले जात नाही असे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: 'कोणाचा बाप आला तरी जमिनी देणार नाही’; शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, मोजणीच्या नोटिसींची होळी

Eknath Shinde Vishakha Raut : ‘पद वाचवा, २० नगरसेवक फोडते’; विशाखा राऊत यांचा एकनाथ शिंदेंना प्रस्ताव? समाधान सरवणकरांचा धक्कादायक दावा

Pune Railway: पुणे-हडपसर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका सज्ज; वाहतुकीतील क्रॉसिंगचा अडथळा दूर; प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटलांवर मध्यरात्री उपचार, सलाइन लावले

SCROLL FOR NEXT