Nagpur NMC fined 1 thousand rupees before opening ganesh idol shops shops
Nagpur NMC fined 1 thousand rupees before opening ganesh idol shops shops  
नागपूर

नागपूर महापालिकेचा भोंगळ कारभार! दुकान लावण्यापुर्वीच आकारला इतके रुपये दंड.. वाचा काय आहे प्रकार

केवल जीवनतारे

नागपूर: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागपूर महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गणेशोत्सव तोंडावर आला आहे. गणेशांच्या मुर्ती तयार करण्याऱ्यांचे जगणे या व्यवसायावरच असते. अशावेळी मुर्तीकारांनी चौकाचौकात दुकाने थाटण्याची परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. मात्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अफलातून प्रकार सुरू केला आहे. 

शहरात रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी मुर्तीकारांना दुकान लावण्यासाठी २०० रुपये शुल्क आकरण्यात यावे अशी अधिसूचना महापापालिकेतर्फे काढण्यात आली आहे. मात्र नेमकी तारीख दिली नाही. यामुळे झोन कार्यालये परवानगी देत नाही. मात्र काही झोन परिसरात सर्रास दुकाने थाटली आहेत. नेहरुनगर झोनमध्ये भलवताच प्रकार पुढे आला आहे.

तब्बल एक हजाराचा दंड 

मुर्तीकारांना दुकाने लावण्यापुर्वीच १ हजार रुपयांच्या दंडाची पावती मुर्तीकारांच्या हाती देण्यात येत आहे. मुर्ती विकण्यापुर्वीच हजार रुपयांचा दंड का भरायचा हा सवाल मुर्तीकारांचा आहे.

इतका दंड भरायचा कसा 

या परिसरातील मुर्तीकारांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी १ हजार रुपये दंडाची पावती दिली आहे. प्रकाश खंडारे, प्रकाश कपात यांच्या नावाने या पावत्या दिल्या आहेत. एक हजार रुपये दंड केला जात असून हीच तुम्हाला परवानगी असल्याचे अधिकारी सांगत असल्याची व्यथा गणेशमूर्तिकार सांगत आहे. सर्व सण कोरोनाच्या सावटाखाली होते, यामुळे जगणे कठिण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत १ हजार रुपयांचा दंड कसा भरायचा. यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा. गरीब मुर्तीकारांच्या जगण्यावर आघात करू नये अशी विनवणी निवेदनाद्वारे केली आहे.

सर्रास सुरू आहेत दुकाने

लकडगंड झोन परिसरात अनेक मुर्तीकारांनी गणेशमुर्ती विकण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांना अद्याप अधिसूचना आली नाही, असे सांगण्यात येत आहे, मात्र दुसरीकडे झोन कार्यालयापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर ३० बाय २० च्या जागेत एका मुर्तीकाराने सर्रास गणेशमुर्ती विक्रीचे दूकान थाटले आहे. मागील चार दिवसांपासून हे दूकान सुरू आहे. यामुळे हे दूकान महापालिकेच्या झोन अधिकाऱ्यांच्या छत्रछायेत सुरू असल्याची जोरदार चर्चा येथे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT