nana patole may be new congress president of maharashtra 
नागपूर

नव्या काँग्रेस प्रदेशाध्यपदासाठी नावाची चर्चा रंगताच नाना पटोलेंनी दिले सूचक उत्तर

अतुल मेहेरे

नागपूर : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.

नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, पक्षाकडे काहीही मागायचे नाही, हे मी ठरवले आहे. त्यामुळे मी प्रदेशाध्यक्ष होणार की नाही, याबाबत काहीही सांगू शकत नाही. पण पक्षाने ती जबाबदारी दिल्यास निश्चितपणे पार पाडीन, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची सुप्त इच्छा आता लपून राहिली नाही. जेव्हा त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले, तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. पण पक्षाने जबाबदारी दिल्यामुळे ते विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. 

पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. त्यामुळेच की काय गेल्या एक वर्षातील अध्यक्षांच्या कामकाजाची नोंद सर्व माध्यमांनी घेतली, ही गौरवाची बाब आहे. यापूर्वी सरकारच्या कामकाजाचा एक वर्षाचा आढावा माध्यमांकडून घेतला जायचा. यावेळी प्रथमच विधानसभा अध्यक्षांच्या कामकाकाजाची दखल घेण्यात आली आहे. पक्षाने दिलेल्या पदाचा योग्य उपयोग जनतेसाठी करणे, हे कौशल्य आहे आणि ते करतोय, असे पटोले म्हणाले. 

पटोले म्हणाले, कर्नाटक राज्यात ते झाले, ते महाराष्ट्रात होऊ नये, असे कदाचित तेव्हा पक्षश्रेष्ठींना वाटले असावे. काहीही गडबड झाली तर अध्यक्षपद हे सरकारला चालवू शकते. त्यामुळे मला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष न करता विधानसभेचा अध्यक्ष करण्यात आले असावे. विधानसभा सक्षमपणे सांभाळली गेली, तर राज्याचा कारभार सुरळीत राहतो, हा इतिहास आहे. आज विधानसभेचे कार्यालय आम्ही नागपुरात नेहमीसाठी सुरू करतोय. इतिहासात याची नोंद राहील आणि ही गोष्ट विदर्भासाठी महत्वाची आहे. कारण गेल्या अनेक वर्षांत आजवर विदर्भासाठी कुणीही हे काम केले नाही आणि तसा विचारही केला नाही, असेही ते म्हणाले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT