Nitin Gadkari Nitin Gadkari
नागपूर

गडकरी म्हणाले, दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता थकून गेलो

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : मी कधी थकत नाही. परंतु, कधी कधी काम करावे की नाही असे वाटते. कारण, एक लाख कोटींचा मुंबई-दिल्ली हायवे जागेचे अधिग्रहण करून ग्रीन हायवे बांधला. परंतु, महालामधील माझ्या घरासमोरचा राजे मुधोजी हा दोन किलोमीटरचा रस्ता बांधता बांधता मी थकून गेलो, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एकच हशा पिकवला.

पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात नितीन गडकरी बोलत होते. सहा वर्षांपासून मी महालात गेलो नाही. या रस्त्याचे काम (Road construction) सुरू असताना किती लोक या कामाच्या विरोधात न्यायालयात जातात आणि किती न्यायाधीश या कामाला स्टे देतात. न्यायालयाचा पूर्ण आदर सन्मान राखत यावरही एखादे पुस्तक लिहावे, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

येवढा मोठा हायवे दोन वर्षांत बांधून तयार झाला. परंतु, हा दोन किलोमीटरचा रस्ता करताना थकून गेलो. आता ठरवले की मॉडेल मिल चौकापासूनचा तो रस्ता मोठा (Road construction) करायचा आणि मेयो हॉस्पिटलपासून शहीद चौकापर्यंतचा रस्ता तोडून तो पुढे हरीहर मंदिरापर्यंत मोठा करायचे आहे, असेही ते म्हणाले.

फुटाळ्याच्या मागे पंजाबराव देशमुख विद्यापीठाच्या जागेवर तीन मजली इमारत तयार होते आहे. त्यामध्ये फूड मॉल आहे. फुटपाथवर खाणारे जे लोक आहे, त्यांची व्यवस्था तेथे करायची आहे. त्यासाठी त्या इमारतीमध्ये फेरीवाल्याचे दुकान असले पाहिजे. त्यामुळे गरिबांनाही मॉलमध्ये बसून खाता येईल. ते तीन मजले बनल्यानंतर वरती पुन्हा दोन मजले बनवायचे आहेत. तिथे तीन मल्टीप्लेक्स करायचे आहेत. त्याच्यावर रिव्हॉल्विंग रेस्टॉरंट बनवायचे आहे, असेही नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT