नितीन गडकरी saka
नागपूर

शहर घडविणाऱ्यांचा इतिहास लिहिला जावा : नितीन गडकरी

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी : सुरेश भट सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहराच्या जडणघडणीत शहरातील अनेकांचा वाटा आहे. त्यांचा इतिहास लिहिला जावा.तसेच भावी पिढीला त्यांच्या कार्याची माहिती व्हावी, त्यासाठी त्यांच्यावर पुस्तक काढावे, असा सल्ला केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज महापौर दयाशंकर तिवारी यांना दिला.

‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’, ‘सीनियर सिटीझन कौन्सिल ऑफ नागपूर’ आणि महानगरपालिका यांच्या सहकार्याने सुरेश भट सभागृहात आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, गलिच्छ वस्ती निर्मूलन समिती व घरबांधणी विशेष समिती सभापती हरीश दिकोंडवार, हनुमाननगर झोन सभापती कल्पना कुंभलकर, धरमपेठ झोन सभापती सुनील हिरणवार, ज्येष्ठ नगरसेवक तथा नासुप्रचे विश्वस्त संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, संदीप जाधव, सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, नगरसेवक किशोर जिचकार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश भगत, उपायुक्त विजय देशमुख, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मनोहरराव खर्चे, सचिव सुरेश रेवतकर, शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर, हनुमान नगर झोनच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे, क्रीडा अधिकारी पीयूष आंबूलकर आदी उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, यंदाचे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी म्हणून साजरा करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याची यशोगाथा प्रेरणादायी आहे. ही यशोगाथा देशाच्या भावी पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. आरोग्याच्या सुविधांमुळे आता आयुष्य वाढले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी सकारात्मक कृती व आत्मविश्वासाने जगावे. यासाठी आनंदी राहावे, असे आवाहन गडकरी यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात सांगितले.

यावेळी माजी महापौर कुंदा विजयकर, मेजर हेमंत जकाते, मेजर प्रभाकर पुराणिक, वॉरंट ऑफिसर टिकाराम, नाथक एल. एम. बशीशंकर, साजेंट मनोहर वातकूलकर, जंगलिया दुफारे, लक्ष्मण पी. लोखंडे, डॉ. मधुपजी पांडे, सर्जेराव गलपट, दिवाकर ढवळे, कमलाकर धारव, अरविंद खांडेकर, तुकारामजी भोतमांगे, रामरतन सारडा, चंद्रकांत भाई ठक्कर, प्रकाश एदलाबादकर, हरिदास टेंभुर्णे, रूपा कुलकर्णी, अजित दिवाळकर यांच्यासह शेकडो ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्यसेनानींचा गौरव

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी कार्यक्रमात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये योगदान देणाऱ्या मान्यवरांना सन्मानित केले. सत्यभामा गोसेवाडे, लीलाबाई चितळे, अंजनाबाई निमजे, बसंत कुमार चौरसिया, महादेव कामडी, प्रभा अहिरकर, सखुबाई अतकूरवार, यमुनाबाई डोर्लीकर, कलावती खिरेकर, बानूबाई आदमकर, शांताबाई पिंपळकर, चारुमती सोनी, विमल खोरगडे या स्वातंत्र्य सेनानींचा ना. नितीन गडकरी यांनी सत्कार केला. विपरीत परिस्थितीत कुटुंब आणि सामाजिक विरोध झुगारून प्रेम विवाह करणारे डॉ. ढवळे दाम्पत्य आणि रामटेके दाम्पत्य यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT