Notorious gangster rapes girl at Nagpur 
नागपूर

सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सलग वीस दिवस केला बलात्कार, अन्‌ मग...

अनिल कांबळे

नागपूर : नाव गुरूदयाल... वय वर्षे 22... राहणार झिंगाबाई टाकळी... व्यवसायाने कुख्यात गुंड... त्याच्याविरुद्ध शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत... तसेच खंडणी मागणे, बाजारात दुकानदारांना धमक्‍या देणे, बळजबरीने पैसे मागणे आणि घरफोड्या करणे असे गुन्हे दाखल आहेत... त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात आढले... यानंतर तिचे अपहरण केले... यावरच तो थांबला नाही तर... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदयाल खतरिया (वय 22, रा. झिंगाबाई टाकळी) हा कुख्यात गुंड आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी मागणे, बाजारात दुकानदारांना धमक्‍या देणे, बळजबरीने पैसे मागणे, घरफोड्या करणे असे शहरातील विविध पोलिस ठाण्यात 11 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो कुख्यात गुंड असल्याने पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र, तो काही सापडत नव्हता.

मानकापूर परिसरात 16 वर्षीय अलवयील मुलगी आई-वडिलांसह राहते. वडील चौकीदारी करतात तर आई धुणीभांडी करते. मुलगी धंतोलीतील शाळेत नववीची विद्यार्थिनी आहे. गुरुदयालने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आर्थिक स्थितीने गांजलेल्या मुलीला त्याने मेकअप बॉक्‍स व पैसे दिले. तसेच तिला हॉटेलमध्ये जेवण, नास्ता आणि फुटाळा-अंबाझरीवर फिरायला जायची सवय लावली. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखविले. 

मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने लग्न करणे शक्‍य नसल्याचे गुरुदयालच्या लक्षात आले. यामुळे त्याने तिला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले. 12 एप्रिलला दुपारी त्याने मुलीचे अपहरण केले आणि तिच्यावर सतत 20 दिवस बलात्कार केला. 
मुलगी बेपत्ता झाल्याने नातेवाइकाने मानकापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला. 

दरम्यान, गुरुदयाल हा पिटेसूर भागातील जंगलात मुलीसोबत असल्याचे पोलिसांना कळले. पोलिस उपायुक्त विनीता साहू यांच्या मार्गदर्शनात मानकापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश ठाकरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक अमित मिश्रा, शिपाई प्रमोद दिघोरे, इस्माइल नौरंगाबादे, सुनील विश्वकर्मा व महिला पोलिस शिपाई मीना मस्के यांनी सापळा रचला. पोलिसांना बघताच गुरुदयाल पळायला लागला. पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून त्याला अटक केली व मुलीची सुटका केली. त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी अत्याचाराचाही गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियाचा वापर नडला

पोलिसांच्या भीतीमुळे गुरुदयाल पिटेसूर भागातील गिट्टीच्या खदानजवळील परिसरात लपून बसला होता. त्याने फेसबूकवर स्वतःचा फोटो पोस्ट केला. हा फोटो त्याच्या मित्राने बघितला. या फेसबूक पोस्टच्या आधारे पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले. त्यानंतर पोलिसांनी गुरुदयाल याला अटक करण्यासाठी सापळा रचला. मात्र, पोलिस आपल्या मागावर असल्याची त्याला माहिती झाली. त्यामुळे तेथून दोघांनीही जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून अटक केली. 

पोलिसांना गुंगारा देण्यात माहीर

गुरुदयाल हा कुख्यात गुंड असून, त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस त्याच्या शोधात होते. परंतु, गुरुदयाल हा पोलिसांना गुंगारा देण्यात माहीर होता. त्याने अनेकवेळा पळ काढला होता. तो पोलिसांच्या हाती येत नव्हता. मात्र, फेसबूकवर केलेल्या पोस्टमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT