people not getting destitute fund from six months in nagpur 
नागपूर

सहा महिन्यांपासून निराधारचा निधीच नाही, दोन्ही पाय लुळे पडूनही पेपरचे पाकीटे बनवून जगतात जीवन

नरेंद्र चोरे

नागपूर : दिव्यांगांना मानसन्मानाने जगता यावे म्हणून राज्य सरकार त्यांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दर महिन्याला एक हजाराची आर्थिक मदत देते. त्या पैशाचा प्रकाश हिवसेंसारख्या गोरगरीब दिव्यांगांना मोठा आधार मिळतो. मात्र, शासनाने गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्यांच्या खात्यात पैसेच जमा केले नाही. त्यामुळे ते नाइलाजाने पेपरचे पाकीटे बनवून विकतात. त्यावर उदरनिर्वाह करतात. हिवसेंसारखीच अनेकांची गत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

मला व माझ्या पत्नीला बारा-तेरा वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेतून आर्थिक मदत मिळते. आतापर्यंत नियमित पैसे जमा होत गेले. मात्र, जूनपासून दमडीही जमा झाली नाही. माझ्यासारखी अनेकांची हीच अवस्था आहे. या अडचणीच्या काळात शासनाने लवकरात लवकर मदत जमा करावी. 

शिवणगाव येथे राहणारे ४६ वर्षीय प्रकाश जन्मापासूनच पोलिओने अपंग आहेत. दोन्ही पाय लुळे पडल्याने त्यांना चालता येत नाही. त्यांची पत्नी आशाही अपंग आहे. उदरनिर्वाहासाठी प्रकाश पानठेला चालवायचे. मात्र, कोरोनामुळे पानठेला बंद करावा लागला. पोटाची भूक भागविण्यासाठी नाइलाजाने पेपरचे पाकीट बनवून विकावे लागत आहे. पती-पत्नी विकत घेतलेल्या किंवा कुणी दिलेल्या रद्दीतून दिवसभर कागदी पिशव्या व पाकीट बनवतात. महागाईच्या काळात जीवन जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे प्रकाश यांनी सांगितले. प्रकाश बारावीपर्यंत शिकलेले असून, आशा बी. कॉम. झालेल्या आहेत. त्यांना अकरा वर्षांचा मुलगा आहे. घर मिहान प्रकल्पात गेल्याचे ते म्हणाले. 

कोरोनामुळे पानठेला बंद करावा लागला. आम्हाला कुणाचीही सहानुभूती नको आहे. केवळ आमचा हक्क पाहिजे. शासन आमची अडचण समजून घेईल, अशी अपेक्षा आहे. 
- प्रकाश हिवसे, दिव्यांग 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT