rates of chilli are high due to exporting  
नागपूर

लाल मिरची झाली तिखट; निर्यात वाढल्याचा परिणाम; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार फटका

राजेश रामपूरकर

नागपूर :  परदेशातून वाढलेली मागणी, शीतगृहातील संपत चाललेला साठा या दोन कारणामुळे मिरचीच्या दरात वाढ झालेली आहे. त्यामुळे अचानकच लाल मिरची अधिकच तिखट झालेली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. 

मार्च आणि एप्रिल या मोसमात दरवर्षी विदेशात मोठ्या प्रमाणात मिरचीची निर्यात होत असते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगात टाळेबंदी होती, तशीच भारतातही होती.चिनमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर तेथून लाल मिरचीची मागणी घटली होती. दरम्यान, बांगलादेश, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि थायलंड या देशात भारतीय मिरचीची मागणी वाढू लागली होती. मात्र, कोरोनामुळे अचानक त्यावर निर्बंध आलेत. 

देशातील टाळेबंदी आता थोडी शिथिल झाल्यानंतर चीन, बांगलादेश, फिलीपाईन्स, इंडोनेशिया या देशात मिरचीची मागणी अचानक वाढली. मात्र, व्यापाऱ्यांकडील शीतगृहातील मिरची संपत आलेली आहे. नवीन मिरची बाजारात येण्यासाठी अजून चार ते पाच महिन्याचा अवधी आहे. एकूण मिरचीचा उपलब्ध साठा पाहता मिरचीचे भाव तेजीत असल्याचे व्यापारी मिरची व्यापारी संजय वाधवानी यांनी सांगितले. 

मिरचीवर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येतो. मिरची जीवनावश्यक वस्तू आहे. त्यामुळे मिरचीवर जीएसटी आकारू नये अशी मागणी मिरची व्यापाऱ्यांची आहे. जीएसटी आकारणीमुळेही किरकोळ बाजारात मिरचीचे भाव वाढले असल्याचे बोलले जात आहे. साधारण जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला लाल मिरचीचे भाव कमी असतात. 

यंदा तेलंगणामध्ये लाल मिरचीचे अडीच कोटी पोती (चाळीस किलोचे एक पोते), कर्नाटकामध्ये ६० ते ६५ लाख पोती उत्पादन झाल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशात आठ ते दहा लाख पोती उत्पादन झाल्याची माहिती आहे. यामुळे देशात एकूण साडे तीन कोटी पोती मिरचीची उत्पादन झाले होते..

कमी उत्पादनमुळे दरवाढ

गतवर्षी मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने जुना साठा संपत आलेला होता. दरम्यान, निर्यात बंद झाल्याने देशांतर्गत मागणी वाढली असताना मिरचीचे भाव प्रति किलो ९० तो १२० रुपयापर्यंत कमी झाले होते. आता विदेशात मागणी वाढल्याने खमंग तेज्या मिरची प्रति किलो १२०ते १४० रुपयावरून १६० ते १८५ पोहोचली आहे. तर गुंट्टूर मिरची ८० ते १३० रुपयावरून १२० ते १६५ देवनुर डिलक्स मिरची १०० ते १२० वरून १२० ते १६५ रुपयावर गेली आहे. त्यामुळे मिरचीचे भाव अचानक वाढले आहेत असे वाधवानी म्हणाले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: पानिपत'कारांच्या गळ्यात मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाची माळ?

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT