rented houses are closed due to corona in nagpur
rented houses are closed due to corona in nagpur 
नागपूर

भाड्याने घर घेता का घर! घरमालकांवर आली भाडेकरू शोधण्याची वेळ

राजेश रामपूरकर

नागपूर : उपराजधानीत शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी तसेच कामगार कोरोनामुळे मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना त्यांनी भाड्याच्या राहत्या खोल्या व घरे तशीच सोडली आहेत. घर आणि खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर मात्र आता भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. 

उपराजधानीत मोठ्या प्रमाणात विविध अभ्यासक्रमांचे महाविद्यालये आहे. तसेच अनेक कारखाने आणि आयटी कंपन्यांनीही आहेत. यात काम करणारे बहुतांश विद्यार्थी अथवा कामगार भाड्याच्या घरात अथवा खोल्यांमध्ये वास्तव्य करतात. पाच ते दहा हजार रुपये अनामत रक्कम आणि दोन हजार रुपयांपासून दहा हजारांपर्यंत घरभाडे आकारले जाते. हिंगणा, बुटीबोरी, पांडे लेआऊट, त्रिमूर्ती नगर, गोपाल नगर, जयताळा, गाडगे नगर, रामदासपेठ, धंतोली, लक्ष्मी नगर, अत्रे लेआऊट, सुर्वे नगर आदी परिसरात विद्यार्थी व नोकरदार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. यातील बहुतेकजण गावी परतल्याने अनेक घरांवर टू लेट अशा पाट्या झळकू लागल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर घर आणि खोल्या भाड्याने देऊन चरितार्थ चालवता यावा म्हणून सेवानिवृत्तीचे पैसे घर बांधण्यासाठी खर्च केले. मात्र, आता भाडेकरी मिळत नसल्याने घरमालक आर्थिक अडचणीत आले आहेत. 

हिंगणा एमआयडीसी परिसरातही अनेकांनी दुमजली घरे बांधली असून स्वत: तळमजल्यावरील खोलीमध्ये राहून वरचे घर हे भाड्याने देऊन त्यामध्ये उदरनिर्वाह करण्यात येतो. मात्र, कोरोनामुळे विद्यार्थी व कामगार घरे व खोल्या रिकामे करून गावी गेले आहे. सरकारकडून एमआयडीसीतील कंपन्या अद्यापही ७० टक्केच सुरू झाल्या आहेत. अद्यापही महाविद्यालये सुरू झालेले नाहीत. विद्यार्थी आपल्या मुळगावातून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू न झाल्यामुळे पालकांनीही गावीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये रिकाम्या झालेल्या घरांचे आणि खोल्या अजूनही बंदच आहे. विशेष म्हणजे शहरातील परिसरामध्ये खोल्या भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. काही घरमालकांना महिन्याला एक लाखापर्यंत भाडे मिळत होते. 

टाळेबंदीनंतर भाडेकरूंनी गेल्या आठ महिन्यापासून घर आणि खोल्या रिकाम्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यानंतर अजूनपर्यंत भाडेकरू मिळाले नाहीत. त्यामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. 
-सुरेश रहाटकर, घरमालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT