RSS Sakal
नागपूर

संघाचे कार्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर? 'जैश' कडून रेकी

रेकी करणाऱ्या व्यक्तीने दोन दिवस नागपुरात वास्तव्य केल्याचेही सांगितले जात आहे.

निनाद कुलकर्णी

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) परिसराची जैशकडून (Jaish-e-Mohammed) रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या वृत्ताला नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीदेखील दुजोरा दिला आहे. जुलै महिन्यातही रेकी (Reiki) करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, रेकी करणाऱ्या व्यक्तीने दोन दिवस नागपुरात (Nagpur) वास्तव्य केल्याचेही सांगितले जात आहे.हे. रेकी करणाऱ्या व्यक्तीने दोन दिवस नागपुरात वास्तव्य केल्याचेही सांगितले जात आहे. रेकी करणाऱ्या तरूणाला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. (RSS Office On Terrorist Attack )

पाकिस्तानमधील (Pakistan) काही व्यक्तींच्या सांगण्यावरून नागपुरात रेकी (Reiki) केल्याचे अटक केलेल्या दहशतवाद्याने कबुल केले आहे. दरम्यान, जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) ही एक दहशतवाद संघटना (Terrorist Organizations) असून याच संघटनेच्या एका दहशतवाद्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिसरासह इतर संवेदनशील भागाची रेकी केल्याचे तपासातून पुढे आले आहे. सेन्ट्रल एजन्सीने केलेल्या तपासातून ही गोष्ट समोर आली असून ही माहिती एजन्सीने नागपूर पोलिसांना दिली आहे.

जम्मू-काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यामधील पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रेनेड बाळगल्याप्रकरणी त्याची चौकशी केल्या नंतर त्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) त्याच्या काही कारवायांबाबत त्याची चौकशी सुरू होती. त्यावेळी या दहशतवाद्याने (Terrorist) जुलै महिन्यामध्ये पाकिस्तानमधील (Pakistan) एका व्यक्तीच्या सांगण्यावरून नागपूरमध्ये दोन दिवस वास्तव्य केले. तसेच शहरातील रेशीमबाग आणि इतर काही भागांची रेकी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्याने सेंट्रल एजन्सीला दिली आहे. त्यानंतर ही माहिती सेंट्रल एजन्सीने (Central Agency) ही माहिती नागपूर पोलिसांना दिली आहे. (RSS Office In Nagpur)

या माहितीनंतर नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) ही माहिती गांभीर्याने घेत या दहशतवाद्याविरोधात आणि आणखी एका व्यक्तीविरोधात UABA अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दहशतवाद्याने ज्या ज्या परिसराची माहिती दिलेली आहे त्या भागातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT